मराठी बातम्या /बातम्या /देश /धरणात बुडत होता तरुण, महिलांनी ओढणीने खेचून वाचवला जीव, पाहा सुटकेचा थरारक VIDEO

धरणात बुडत होता तरुण, महिलांनी ओढणीने खेचून वाचवला जीव, पाहा सुटकेचा थरारक VIDEO

धरणात पडल्यामुळे वाहून जात असलेल्या एका तरुणाला महिलांनी (Women saved a young boy who was dawning in willigdon dam) आपल्या ओढणीचा आधार देत बाहेर ओढून जीव वाचवला आहे.

धरणात पडल्यामुळे वाहून जात असलेल्या एका तरुणाला महिलांनी (Women saved a young boy who was dawning in willigdon dam) आपल्या ओढणीचा आधार देत बाहेर ओढून जीव वाचवला आहे.

धरणात पडल्यामुळे वाहून जात असलेल्या एका तरुणाला महिलांनी (Women saved a young boy who was dawning in willigdon dam) आपल्या ओढणीचा आधार देत बाहेर ओढून जीव वाचवला आहे.

अहमदाबाद, 30 सप्टेंबर : धरणात पडल्यामुळे वाहून जात असलेल्या एका तरुणाला महिलांनी (Women saved a young boy who was dawning in willigdon dam) आपल्या ओढणीचा आधार देत बाहेर ओढून जीव वाचवला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात तोल गेल्याने हा तरुण वाहून जाण्याची (Fear of carrying away in water) शक्यता होती. खोल पाण्यात पडलेल्या या तरुणाला तिथे असणाऱ्या महिलांनी (Women showed presence of mind) प्रसंगावधान राखत वाचवलं. बुडत असलेल्या तरुणाच्या दिशेनं एका महिलेनं आपल्या ओढणीचं एक टोक सोडलं. ते टोक तरुणानं पकडल्यानंतर सर्व महिलांनी मिळून त्याला वर खेचलं.

अशी घडली घटना

गुजरातमधील जुनागढमध्ये असणारं विलिंग्डन धरण हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे हे धरण भरलं आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. या दरम्यान, धरणाच्या काठावरून पाय घसरून एक तरुण खाली पडला. खोल पाण्यात तो बुडायला लागला. कठड्यापासून काही फूट खोल पडल्यामुळे त्याला वर येता येत नव्हतं. हा प्रकार पाहणाऱ्या महिलांनी तातडीनं तरुणाच्या दिशेनं धाव घेतली. त्यातील एका महिलेनं आपली ओढणी तरुणाकडे भिरकावली. तरुणाने ते पकडल्यानंतर सर्व महिलांनी ताकद एकवटत त्याला वर ओढले आणि उचलून बाहेर काढले. महिलांच्या या प्रसंगावधानामुळे तरुणाचे प्राण वाचले.

हे वाचा - तालिबानी फायटरला करायचंय 13 वर्षांच्या मुलीसोबत लग्न, भावाला येतेय धमकी

इशाऱ्यानंतरही गर्दी

गुजरातमध्ये गुलाब चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार असल्यामुळे पर्यटकांनी पाण्यापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. विलिंग्डन धरणाच्या परिसरात पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र तरीदेखील पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं दिसलं होतं. बुधवारी दुपारच्या सुमाराला घडलेल्या या घटनेचं काहीजणांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Gujrat, Viral videos, Women