मराठी बातम्या /बातम्या /देश /

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतरही महिला गर्भवती; आता न्यायालयाचं दार ठोठावलं

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतरही महिला गर्भवती; आता न्यायालयाचं दार ठोठावलं

महिलेला या आधीच चार मुलं आहेत आणि तिला पाचवं मुल नको होतं.

महिलेला या आधीच चार मुलं आहेत आणि तिला पाचवं मुल नको होतं.

महिलेला या आधीच चार मुलं आहेत आणि तिला पाचवं मुल नको होतं.

  • Published by:  Meenal Gangurde

मुजफ्फरपूरमधील (Muzaffarpur ) एक विचित्र घटना समोर आली आहे. कुटुंब नियोजनाचं ऑपरेशनचं  (Family planning operation) एक प्रकरण ग्राहक न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. ऑपरेशन करवून घेणाऱ्या महिलेने आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांवर 11 लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे. कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करुनदेखील मुल झाल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. (Women pregnant even after family planning surgery )

या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने पुढील सुनावणी 16 मार्च रोजी असल्याचं सांगितलं आहे. या महिलेने सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. मोतीपूरमधील महना गावात राहणारी फुलकुमारीने 2019 मध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. 27 जुलै 2019 रोजी फुलकुमारी हिच्यावर मोतीपूर पीएचसीमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती.

हे ही वाचा-फिरण्यासाठी कार नाही चालत-फिरतं घरच घ्या,केवळ 500 रुपयांत;पाहा या कंपन्यांची ऑफर

आधीच चार मुलं आहेत आणि आता...

फुलकुमारीला याआधीच चार मुलं आहेत आणि तिला पाचवं मुल नको होतं. मात्र काही दिवसांपूर्वी तिला कळालं की ती पुन्हा गर्भवती आहे. फुलकुमारी या पाचव्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी तयार नाहीये. ती म्हणते की, जेव्हा तिने मोतीपूर पीएचसीमध्ये जाऊन माहिती दिली तेव्हा तिचं अल्ट्रा साऊंड करण्यात आलं. रिपोर्टमध्ये ती गर्भती असल्याचं समोर आलं. तेव्हापासून फुलकुमारी तणावात आहे. याकारणाने त्याने पाचव्या मुलाचं पालन-पोषण करण्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी 11 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. (Women pregnant even after family planning surgery )

फुलकुमारीचे अधिवक्ता डॉ. एसके झा म्हणाले की, हे गंभीर प्रकरण आहे. ज्यासाठी आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पदाधिकारी जबाबदार आहे. अधिवक्ता म्हणाले की, ते फुलकुमारीच्या न्यायाचा लढा प्रत्येक स्तरावर लढतील.

First published: