राजकारणातील महिलांना एका दिवसाला तब्बल 100 अपमानास्पद ट्विट्स, अश्लिल शिव्यांचा वापर

राजकारणातील महिलांना एका दिवसाला तब्बल 100 अपमानास्पद ट्विट्स, अश्लिल शिव्यांचा वापर

राजकारणातील महिला अत्यंत घाणेरड्या व अपमानास्पद ट्विटस येत होत्या

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : गेल्य़ा काही वर्षांत महिलांसुद्धा राजकारणात पुढे येत आहेत. त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीत तरुण महिलांची संख्याही जास्त होती. महिला केवळ प्रचार करुन थांबत नाहीत तर निवडणुकही लढवतात. याशिवाय निवडणुकीतील महत्त्वाच्य़ा मानल्या जाणाऱ्या सोशल मीडियावरही त्या अपडेट असतात. मात्र ट्विटरवरबाबत केलेल्या एका अभ्यासानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ट्विटरवरुन राजकारणातील महिलांना स्त्री-पुरुष भेदभाव, शिव्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक सात ट्विटमागे एका ट्विटमध्ये महिला राजकारण्यांना अपशब्द वापरला जातो. Amnesty International India ने केलेल्या अभ्यासानुसार महिला नेत्याला प्रत्येक दिवसाला किमान 100 अपमानास्पद ट्विट येत असल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पक्षापेक्षाही इतर पक्षांच्या महिला नेत्यांना 56.7 टक्के अधिक अपमानास्पद शब्दांचे ट्विट येतात. global quantitative analysis नुसार UK aani US मधील निवडणूक लढवणाऱ्या महिलांच्या (7.1) तुलनेत भारतीय महिलांना (13.8) सर्वाधिक शिवीगाळ वा अपमानास्पद ट्विट्स येतात. यामध्ये जाती-धर्मानुसार अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार इतर धर्माच्या तुलनेत मुस्लीम महिलांना तब्बल 55.5 टक्के अपमानास्पद ट्विटस केले जातात. या ट्विटमध्ये महिलांना अश्लिल शब्द वापरले जातात. यामध्ये ‘Witch’ आणि  ‘वेश्या ‘ याबरोबरच पाकिस्तानमध्ये पाठवून देण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारच्या ट्विट्सवरुन ट्विटरवर महिलांचा सन्मान केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

Amnesty International India यांनी अभ्यासासाठी 1,14,716 सॅम्पल्सचा वापर केला असून यामध्ये तब्बल 7 दशलक्ष ट्विटसचा अभ्यास करण्यात आला. याशिवाय 95 भारतीय राजकारणी महिलांचे मार्च ते मे 2019 पर्यंतचे ट्विटर अकाऊंट तपासण्यात आले. महिला राजकारण्यांना ट्विटरवरुन अनेकदा शारिरीक व लैंगिक हिंसाचार, जाती-धर्मावरुन कमेंट, भेदभाव यासांरख्या विषयांवर ट्विट केल्या जात होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2020 12:19 PM IST

ताज्या बातम्या