Home /News /national /

20 वर्षांपूर्वी हरवली, आता पाकिस्तानमध्ये सापडली, मुंबईच्या महिलेची इमोशनल स्टोरी

20 वर्षांपूर्वी हरवली, आता पाकिस्तानमध्ये सापडली, मुंबईच्या महिलेची इमोशनल स्टोरी

मुंबईच्या हमिदा बानो (Hamida Bano) या 20 वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या, पण एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला आहे. सध्या त्या पाकिस्तानमध्ये असून त्यांचं कुटुंब त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

    मुंबई, 3 ऑगस्ट : सोशल मीडियाच्या विषारी आणि विखारी प्रचारामुळे माणसं एकमेकांपासून तुटत चालल्याचा आरोप बरेच वेळा केला जातो, पण याच सोशल मीडियाने माणसं जोडण्याचं कामही बरेच वेळा केलं आहे. मुंबईच्या हमिदा बानो (Hamida Bano) यांनाही असाच अनुभव आला आहे. हमिदा बानो या 20 वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या, पण एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला आहे. हमिदा बानो 20 वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला कूक म्हणून नोकरी करण्यासाठी गेल्या आणि परत आल्याच नाहीत. हमिदा बानो यांनी पाकिस्तानमधले (Pakistan) युट्यूबर वलिउल्लाह मरूफ यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला, यानंतर त्यांनी हमिदा बानो यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट व्हावी म्हणून व्हिडिओ तयार करून तो युट्यूबवर टाकला. याशिवाय मरूफ यांनी मुंबईमधले सामाजिक कार्यकर्ते खाफलान शेख यांच्याशी संपर्क केला. खाफलान शेख यांनी हा व्हिडिओ वेगेवेगळ्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवला. हा व्हिडिओ बानो यांची मुलगी यस्मीन बशीर शेख यांच्यापर्यंत पोहोचला. यस्मीन या कुर्ल्याच्या कसाईवाडा भागात राहतात. यस्मीनने आईला ओळखल्यानंतर या दोघींमध्ये 20 वर्षांनी बोलणं झालं. आता हमिदा यांना भारतात आणण्यासाठी त्यांचं कुटुंब पाकिस्तान उच्चायुक्तांशी बोलणार आहे. 20 वर्षांपूर्वी काय झालं? हमिदा बानो यांना 2002 साली कूकच्या कामासाठी दुबईला नेतो असं सांगून भारतातून बाहेर नेण्यात आलं, पण एजंटच्या निष्काळजीपणामुळे त्या पाकिस्तानात पोहोचल्या. पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर बानो सिंध भागातल्या हैदराबाद शहरात राहू लागल्या. इथल्याच स्थानिक व्यक्तीशी त्यांनी लग्न केलं. पतीचा मृत्यू झाल्यानंतर आता त्या मुलासोबत राहत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या