शरीरसंबंधाला नकार, महिलेनं १३ वर्षांच्या मुलाचे जाळले गुप्तांग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही २० वर्षांची विवाहीत आहे. मागील शुक्रवारी दुपारी घरी एकटी असताना तिने पीडित मुलाला आपल्या घरी बोलावलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2018 07:19 PM IST

शरीरसंबंधाला नकार, महिलेनं १३ वर्षांच्या मुलाचे जाळले गुप्तांग

नवी दिल्ली, 10 आॅक्टोबर : ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेनं एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे गुप्तांग चिमट्याने जाळून टाकण्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरसंबंधासाठी नकार दिला म्हणून या महिलेनं हे कृत्य केल्याचं सांगितलं. आरोपी महिला फरार आहे.

ग्रेटर नोएडा येथील चपरौला इथं ही घटना घडलीये. पीडित मुलाच्या आईने सांगितलं की, आरोपी महिला ही विवाहीत आहे. तीने आपल्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही २० वर्षांची विवाहीत आहे. मागील शुक्रवारी दुपारी घरी एकटी असताना तिने पीडित मुलाला आपल्या घरी बोलावलं होतं.

आरोपी महिलेच्या विरोधात मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरण, जखमी करणे आणि धमकी देण्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय.

या महिलेच्या विरोधात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Loading...

या प्रकारची ही पहिला घटना नाही. मागील वर्षी केरळमध्येही मलप्पुरममध्ये एका ३० वर्षीय महिलेनं आपल्या प्रियकराचे गुप्तांग चाकूने कापले होते. जेव्हा या महिलेला कळलं की तिच्या प्रियकराचे एका विवाहीत महिलेसोबत संबंध जुळले आहे. या महिलेला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते पण त्याने धोका दिला म्हणून तिने प्रियकराचे गुप्तांग कापले.

मागील महिन्यात हरियाणामध्येही अशीच घटना घडली होती. एका तरुणाचे गुप्तांग कापून त्याला तृतीयपंथी बनवले.

===========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...