News18 Lokmat

बीचवर फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार

बीचवर आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही हादरुन टाकणारी घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 09:19 AM IST

बीचवर फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार

बंगळुरू, 27 नोव्हेंबर : बीचवर आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही हादरुन टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

मंगळुरु शहरातील बेंगेर बीचवर एक महिला आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. याचवेळी तिथं एका टोळक्यानं या महिलेला त्रास द्यायला सुरूवात केली.

त्यानंतर महिला व तिच्या मित्राने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याने महिलेच्या मित्राला मारहाण करून या महिलेवर सामुहिक बलात्कार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी सहा नराधमांना अटक केली आहे. तसंच अजून एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बीचसारख्या ठिकाणी महिलेवर सामुहिक बलात्कार होत असेल तर महिला सुरक्षेचा काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, म्हणून पोलीस प्रशासनाने पाऊलं उचलावीत अशी मागणी आता समोर येत आहे.

Loading...


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...