जयपूर, इम्तियाज भाटी, 14 एप्रिल : बीडमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणानं सारा महाराष्ट्र हादरून गेला. परळीतील डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे यांची कृत्य ऐकल्यानंतर राज्यात संतापाची लाट आली. सध्या मुंडे दाम्पत्य कारागृहात आहे. असाच प्रकार आता राजस्थानमधील सिंघाना येथे समोर आला आहे. या प्रकरणामध्ये सिंघाना येथील डॉक्टर रवि सिंहला पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत हिस्ट्रीशीटर म्हणून घोषित केलं गेलं आहे. आत्तापर्यंत रवि सिंहनं 1 हजारपेक्षा जास्त स्त्री भ्रूण हत्या केल्याची माहिती आता समोर येत आहे. चार प्रकरणांमध्ये त्याला अटक देखील करण्यात आली होती. खेतडी, बुहाना, सुरजगढ आणि सिंघाना या जिल्ह्यांमध्ये डॉ. रवि सिंह यांनं आपला धंदा सुरू केला होता. रवि सिंह हा सिंघाना जिल्ह्यातील भैसावता गावातील रहिवासी आहे.
किरीट सोमय्याच्या वाक्यावरून राष्ट्रवादीने तयार केलं प्रचारगीत!
30 ते 50 हजार रूपये घ्यायचा डॉक्टर
दरम्यान, लिंग कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी रवि सिंह 30 ते 50 हजार रूपये घ्यायचा. तर गर्भपात करण्यासाठी वेगळे 10 ते 30 हजार रूपये घ्यायचा. पण, त्याच्याविरोधात आता पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रवि सिंहच्या चेहऱ्यावर केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसत नाही. 2016 ते 2018 या काळात त्याला 4 वेळा अवैध सोनोग्राफी मशीनसह पकडण्यात आलं आहे.
VIDEO : गाडी थांबवली म्हणून बाप-लेकांनी वाहतूक पोलिसांवर उचलला हात