S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

भारतात महिलांना वेतन कमी, नोकरीमध्येही लिंगभेद अद्याप सुरूच

भारतात महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन कमी दिलं जातं. याशिवाय भारतासह जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद अद्यापही सुरूच आहे अशी माहिती कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून समोर आली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 28, 2018 09:02 AM IST

भारतात महिलांना वेतन कमी, नोकरीमध्येही लिंगभेद अद्याप सुरूच

28 एप्रिल : भारतात महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन कमी दिलं जातं. याशिवाय भारतासह जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद अद्यापही सुरूच आहे अशी माहिती कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून समोर आली आहे. या माहितीमुळे आपण खरंच आधुनिक झालो आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतो.

या जागतिक स्तराचा विचार केला असता तिथेही महिलांची स्थिती सारखीच आहे. जागतिक स्तरावरही पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के महिलांना कमी वेतन दिलं जातं. त्यामुळे महिलांना अद्यापही त्यांचे हक्क मिळाले नाही असंच म्हणावं लागेल.

एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे. तर सारखेच काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे.भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या वेतनामधील अंतर चार टक्के आहे. तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणाऱ्या कंपनीमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे.

या सगळ्या भेदामुळे महिला सक्षम आणि स्वतंत्र्य झाल्या नाही असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पण या सगळ्यात महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण सगळ्यांनी बदल्याण्याची गरज आहे. त्यानेच आपला देश आधुनिक झाला असं म्हणता येईल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close