मराठी बातम्या /बातम्या /देश /महिला आयोगाच्या मेसेजमुळे SEX रॅकेट उघडकीस! स्पा सेंटरमधून समोर आली 150 हून अधिक कॉल गर्ल्सची रेट लिस्ट

महिला आयोगाच्या मेसेजमुळे SEX रॅकेट उघडकीस! स्पा सेंटरमधून समोर आली 150 हून अधिक कॉल गर्ल्सची रेट लिस्ट

आयोगाच्या टीमला मिळालेल्या एका मेसेजमध्ये स्पाकडून एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये एकावेळी 2500 रुपये लागतील, तर एका रात्रीसाठी 7000 रुपये लागतील, अशी माहिती देण्यात आली होती

आयोगाच्या टीमला मिळालेल्या एका मेसेजमध्ये स्पाकडून एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये एकावेळी 2500 रुपये लागतील, तर एका रात्रीसाठी 7000 रुपये लागतील, अशी माहिती देण्यात आली होती

आयोगाच्या टीमला मिळालेल्या एका मेसेजमध्ये स्पाकडून एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये एकावेळी 2500 रुपये लागतील, तर एका रात्रीसाठी 7000 रुपये लागतील, अशी माहिती देण्यात आली होती

  नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : दिवसभराच्या धावपळीनंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी स्पा (Spa) सेंटर किंवा मसाज (Massage) पार्लरमध्ये काहीजण जातात. आजकाल स्पा सेंटरचा बोर्ड प्रत्येक लहान मोठ्या शहरात दिसत आहे. पण दिल्लीत (Delhi) काही ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट (Sex Rackets) चालवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सेक्स रॅकेट चालवण्यासाठी जस्ट डायल ( Justdial ) सारख्या सेवेचा वापर केला जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महिला आयोगाने जस्ट डायल कंपनीला समन्स जारी केलं आहे. आजतकने याबाबत वृत्त दिलं आहे.

  दिल्लीतील अनेक स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याच्या तक्रारी दिल्ली महिला आयोगाला मिळाल्या होत्या. ज्यांचा तपास करताना तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे पुरावेही सापडले आहेत. आयोगाने तपास पथक तयार करून तक्रारींची दखल घेतली होती. तपास पथकाने दिल्लीत सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या संपर्क क्रमांकांची चौकशी केली. 24 तासांच्या आत, टीमला 15 हून अधिक कॉल्स आणि 32 व्हॉट्सअॅप मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींची छायाचित्रे आणि 'सेवा दर' दिले होते.

  पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला अटक

  आयोगाच्या टीमला मिळालेल्या एका मेसेजमध्ये स्पाकडून एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये एकावेळी 2500 रुपये लागतील, तर एका रात्रीसाठी 7000 रुपये लागतील, अशी माहिती देण्यात आली होती. तुम्हाला चांगली सेवा मिळेल. सर, सेवेत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असेही या मेसेजमध्ये म्हटले होते. एवढेच नाही तर अन्य एका नंबरवरूनही असाच मेसेज आला होता. ज्यामध्ये 14 तरुणींचे फोटो शेअर केले होते आणि तशाच ऑफर्सही देण्यात आल्या होत्या. इतर सर्व मेसेज लज्जा उत्पन्न होईल, असेच होते. ज्यामध्ये 'सुंदर आणि तरुण' भारतीय आणि परदेशी मुलींसोबत सेवेच्या म्हणजेच सेक्सच्या ऑफर देण्यात आल्या होत्या.

  महिला आयोगाच्या टीमने स्पा सेवेबाबतचा तपशील मागितला असता, कशा पद्धतीने सेक्स रॅकेट चालते, हे समोर आले आहे. चौकशीमध्ये काही स्पा सेंटरने सुद्धा ताबडतोब तेथे चालणाऱ्या सर्व बेकायदेशीर गोष्टी आणि वेश्याव्यवसाय बाबत माहिती दिली. या प्रकरणाची दखल घेत महिला आयोगाने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला कठोर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली असून जस्ट डायलच्या व्यवस्थापनाला समन्स बजावले आहे.

  समाज सेविकेच्या घरात सुरू होता सेक्स रॅकेट; पालिका निवडणूकही लढली होती

  आयोगाने जस्ट डायलवर नोंदणी केलेल्या सर्व स्पा सेंटरची यादी आणि त्यांच्या नोंदणीसाठी लागू असलेल्या मानकांचा तपशीलही मागवला आहे. जस्ट डायलला विशेषत: सेक्स सेवा पुरवण्यासाठी आयोगाच्या टीमला संदेश पाठवणाऱ्या स्पाचा तपशील देण्यास सांगण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने दिल्ली गुन्हे शाखेकडून १२ नोव्हेंबर 2021पर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवालही मागवला आहे.

  स्पा सेंटरच्या नावाखाली अशा पद्धतीने सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याचा प्रकार समोर आल्याने आता हे प्रकार रोखण्याचे आव्हान विविध यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. यासाठी कठोर भूमिका संबंधित सर्वच यंत्रणांना घ्यावी लागणार आहे.

  First published:

  Tags: Delhi, Sex racket