Home /News /national /

रुग्णालयातून पळ काढण्यासाठी महिलेचा जीवघेणा स्टंट; तिसऱ्या मजल्यावरुन पाईपच्या मदतीने उतरली

रुग्णालयातून पळ काढण्यासाठी महिलेचा जीवघेणा स्टंट; तिसऱ्या मजल्यावरुन पाईपच्या मदतीने उतरली

या महिलेने यापूर्वीही असाच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता

    उत्तर प्रदेश, 22 ऑगस्ट : एकीकडे देशभरात कोरोना कहर वाढत असताना नागरिकांना अधिक सावध राहण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यातच मेरठमधील या घटनेनंतर पोलिसांचा शोध सुरू झाला आहे मेरळमधून मेडिकल कॉलेज रुग्णालयात भर्ती एक महिला रुग्ण इतकी वैतागली की तिने थेट तिसऱ्या माळ्यावरुन पाईपच्या मदतीने खाली उतरुन पळ काढला. आता सर्वजण तिचा शोध घेत आहेत. सीसीटिव्हीमध्ये ती पाईपला धरुन उतरत असतानाचे फुटेज कैद झाले आहेत. तिचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सांगितले जात आहे की, अयोध्येत राहणारी ही महिला चांदणी मेडिकलमध्ये मनोरुग्ण वॉर्डमध्ये भर्ती होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ती मतीमंद आहे. तिने टाळं तोडून मागच्या रस्त्याने तिसऱ्या माळ्यावरुन पाईपाच्या मदतीने खाली उतरली आणि पळ काढला. हे वाचा-अॅनाकोंडानं मगरीला जिवंत गिळलं, पाहा शिकारीचा दुर्मीळ VIDEO रुग्णालयत प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. ते तिचा शोध घेत आहेत. अद्याप ही महिला बेपत्ता आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या मानसिक आजार विभागाचे अध्यक्ष डॉ. तरुण पाल यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालातून रेफर होऊन 7 ऑगस्ट रोजी तिला येथे भर्ती करण्यात आलं होतं. 14 ऑगस्टलाही ती कोणालाही न सांगता वॉर्डातून गायब झाली होती. पोलिसांनी हिचा शोध घेत तिला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. बुधवारी या महिलेने वॉर्डच्या मागील बाजूला असलेल्या पाईपलाइनच्या मदतीने खाली उतरली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या