शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलेच्या सासूनंच केला हल्ला, प्रकृती स्थिर

शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलेच्या सासूनंच केला हल्ला, प्रकृती स्थिर

केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलेच्या सासूनं तिच्यावर हल्ला केलाय.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 15 जानेवारी : केरळात प्रसिद्ध शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलेवर तिच्या सासूनंच हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टानं मंदिरात महिलांना प्रवेश सुरू करून दिला. तेव्हा कनकदुर्गा भगवान अयप्पांचं दर्शन करणाऱ्या महिलांच्या ग्रुपमध्ये होती. तिनं 2 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला.

त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. म्हणून ती घरी परतण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी थांबली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ती घरी परतली, तेव्हा तिच्या सासूनं तिच्यावर हल्ला केला. तिच्या डोक्यावर वार केला. कनकदुर्गाला हाॅस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. तिची प्रकृती स्थिर आहे.

शबरीमला मंदिरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 39 वर्षच्या कनकदुर्गा आणि 40 वर्षाच्या बिंदू अम्मीनं भगवान अयप्पाच्या मंदिरात प्रथम प्रवेश केला होता. कनकदुर्गा नागरी सेवेत काम करतेय, तर बिंदू केरळच्या कन्नूर युनिव्हर्सिटीत वकिली शिकवतेय. दोन्ही महिलांना सारख्या धमक्या मिळतायत.

सुप्रीम कोर्टानं 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिला प्रवेशाची बंदी हटवली होती. तेव्हापासून तिथे संघर्ष सुरू आहे. शबरीमला मंदिरासमोर नेहमी पोलीस अधिकारी आणि श्रद्धाळू यांच्यात संघर्ष सुरू असतो.

मध्यंतरी शबरीमला मंदिरामध्ये 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश नसल्यामुळे एका 36 वर्षीय महिलेने वेषांतर करून मंदिरात प्रवेश केला. एस पी मंजू या 36 वर्षीय महिलेने मंदिरात प्रवेश केला आहे.

वृद्ध महिलेचा वेश परिधान करून मंजू मंदिरात गेल्या आणि त्यांनी गाभाऱ्यात जाऊन आयप्पा स्वामींचं दर्शन घेतलं. महिलांना विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मंजूने मंदिरात प्रवेश केला आहे.

VIDEO : नागपुरातही पतंगबाजीला आलं उधाण

First published: January 15, 2019, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading