• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ‘रेस्टॉरंट साडी’ प्रकरणात ट्विस्ट, महिलेनं थप्पड मारल्यामुळं प्रवेश नाकारल्याचं उघड, पाहा VIDEO

‘रेस्टॉरंट साडी’ प्रकरणात ट्विस्ट, महिलेनं थप्पड मारल्यामुळं प्रवेश नाकारल्याचं उघड, पाहा VIDEO

दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये साडी नेसल्यामुळे महिलेला प्रवेश (Woman was rejected entry in restaurant as she slapped manager reveals cctv footage) देण्यात येत नसल्याचा दावा फोल असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमधून उघड झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये साडी नेसल्यामुळे महिलेला प्रवेश (Woman was rejected entry in restaurant as she slapped manager reveals cctv footage) देण्यात येत नसल्याचा दावा फोल असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमधून उघड झालं आहे. पत्रकार अनिता चौधरी (Journalist Anita Choudhary) यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला थप्पड मारल्यामुळेच त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा दिल्लीच्या ऍक्विला रेस्टॉरंटनं केला आहे. यासाठी त्यांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ट्विट केलं असून रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारच्या पोशाखातील (All costumes allowed says restaurant) व्यक्तींना प्रवेश दिला जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. काय होतं प्रकरण? दिल्लीच्या ऍक्विला रेस्टॉरंटमध्ये साडी नेसल्यामुळे आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला, असा दावा अनिता चौधरी नावाच्या महिलेनं केला होता. पत्रकार असणाऱ्या या महिलेनं काही सेकंदांचा व्हिडिओ ट्विट करत साडी नेसल्यामुळेच आपल्याला प्रवेश नाकारल्याचा दावा केला होता. त्यानंतर या रेस्टॉरंटवर चहूबाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली होती. अनेक साडीप्रेमी महिला आणि पुरुष नेटिझन्स रेस्टॉरंटवर तुटून पडले होते. रेस्टॉरंटनं दिलं स्पष्टीकरण केवळ काही सेकंदांच्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता त्यावेळी नेमकं काय घडलं, याचं सीसीटीव्ही फुटेजच रेस्टॉरंटनं जाहीर केलं आहे. ही महिला रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर तिला गेटपाशी थांबवण्यात आलं. रेस्टॉरंटमधील बुकिंग फुल्ल होतं आणि महिलेनं टेबल बुक केलं नव्हतं. त्यामुळं वेटिंग लिस्टमध्ये नाव नोंदवून वाट पाहण्याची विनंती हॉटेल प्रशासनाने तिला केली. मात्र यामुळे संतापलेल्या अनिता चौधरीने व्यवस्थापकाशी वाद घातला आणि त्याच्या कानशिलात लगावली. यामुळेच आम्ही तिला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, असं स्पष्टीकरण रेस्टॉरंटच्या वतीनं देण्यात आलं आहे. हे वाचा - लेकीच्या Admission साठी महिलेला करावं लागलं हे काम; मुख्याध्यापकाचा कांड उघड यापूर्वीही साड्या नेसलेल्या अनेक महिलांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला असून त्याचे अनेक फोटोही आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, असा दावा रेस्टॉरंटने केला आहे.
  Published by:desk news
  First published: