VIDEO : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...रेल्वेतून पडणारी महिला अशी वाचली!

चलती गाडी पकडना खतरनाक है... रेल्वे स्टेशनवरची ही सूचना पाळली नाही तर जीवावर बेतू शकतं. पण RPF च्या जवानामुळे ही महिला त्यातूनही आश्चर्यकारकरित्या बचावली.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 08:04 PM IST

VIDEO : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...रेल्वेतून पडणारी महिला अशी वाचली!

अहमदाबाद, 12 जुलै : रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याची गाडी पकडणं ही एक मोठी जोखीम असते. जर पूर्ण खबरदारी घेतली नाही तर जीवावरही बेतू शकतं. म्हणूनच रेल्वे स्टेशनवर, चालती गाडी न पकडण्याच्या सूचना सारख्या सुरू असतात. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर एका महिला प्रवाशाच्या बाबतीत अशीच घटना घडली. ही महिला रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत होती पण गाडी पकडताना तिचा तोल गेला. तिच्याकडे एक मोठी बॅग होती. त्यामुळे तिला धावतधावत गाडी पकडणं जमत नव्हतं.

Loading...

ही महिला गाडी पकडताना पडलेली पाहून रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा एक जवान चटकन तिच्या दिशेने धावला आणि काही होण्याच्या आत त्याने तिला वाचवलं.खरंतर ही घटना घडली तेव्हा तो फोनवर बोलत होता पण प्रसंगावधान राखून त्याने तिला वाचवलं.

नतालियाच्या शरीरात धडधडतंय रवीचं हृदय...आईबाबांनी ऐकले ठोके

अहमदाबाद स्टेशनवर रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. आरपीएफच्या जवानाला पाहून बाकीचे प्रवासीही या महिलेला मदत करण्यासाठी धावले.

सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला व्हिडिओ

याआधी ओडिशामध्ये सुद्धा अशी घटना घडली होती. एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून पडला पण आश्चर्यकारकरित्या बचावला होता.

अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे.

========================================================================================

'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...