Home /News /national /

स्कूटीवर 1400 KM प्रवास करून लॉकडाऊनदम्यान मुलाला घरी आणलं; आता युक्रेनमध्ये अडकला, महिलेची हृदयद्रावक कथा

स्कूटीवर 1400 KM प्रवास करून लॉकडाऊनदम्यान मुलाला घरी आणलं; आता युक्रेनमध्ये अडकला, महिलेची हृदयद्रावक कथा

राझिया यांनी आपल्या स्कूटीवर 1400 किलोमीटर प्रवास करून मुलाला घरी परत आणलं होतं. मात्र, आपल्या मुलाला या संकटातून बाहेर आणणाऱ्या राझिया आता पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकल्या आहेत

  नवी दिल्ली 04 मार्च : तेलंगणाच्या निझामाबाद येथील शिक्षिका राझिया बेगम (Razia Begum) कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये झळकल्या होत्या. याच कारण म्हणजे अगदी कडक लॉकडाऊनच्या काळात राझिया यांचा मुलगा आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये अडकला होता. यामुळे राझिया यांनी आपल्या स्कूटीवर 1400 किलोमीटर प्रवास करून त्याला घरी परत आणलं होतं (Woman Travels 1,400 Kms for Son During Covid Lockdown). मात्र, आपल्या मुलाला या संकटातून बाहेर आणणाऱ्या राझिया आता पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकल्या आहेत. राझिया यांचा मुलगाही आता त्या हजारो भारतीयांमधील एक आहे, जे रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) युक्रेनमध्ये अडकला आहे (Indian students stuck in Ukraine).

  Ukraine आणि Russia युद्धाबद्दल UPSC मध्ये येतील प्रश्न; अशा पद्धतीनं करा अभ्यास

  यावेळी त्यांचा 19 वर्षांचा मुलगा निजामुद्दीन अमान उत्तर-पूर्व युक्रेनमधील सुमी या शहरात अडकल्याने त्यांना काही करणंही शक्य नाही. तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात युक्रेनमध्ये शिकत आहे. अशात आता युक्रेनवर रशियाकडून हल्ला होत असून हजारो भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युद्धग्रस्त देशात अडकले आहेत. रझिया बेगमच्या म्हणण्यानुसार, निजामुद्दीन अमान सुमीमध्ये 500 विद्यार्थ्यांसह अडकला आहे. त्यांनी सांगितलं की मी बुधवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, गृहमंत्री मोहम्मद महमूद अली आणि वरिष्ठ राज्य सरकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी मदतीची विनंती केली होती. निजामाबादमधील बोधन येथील सलामपद कॅम्प गावात शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या रझिया बेगम द हिंदूशी बोलताना म्हणाल्या, “त्याठिकाणाहून बाहेर पडणं सुरक्षित नसल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करते की, माझ्या मुलासह तिथे अडकलेल्या इतर भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी.

  रशियाचा सर्वात मोठ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला, संपूर्ण युरोप धोक्यात

  मार्च 2020 मध्ये, रझियाने कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे नेल्लोरमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी दुचाकीवरून 1400 किलोमीटर प्रवास केला होता. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की “मला माझ्या मुलाला परत घरी आणायचं होतं. यासाठी मी बोधनचे एसीपी जयपाल रेड्डी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना माझी परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी लगेच मला नेल्लोरला जाण्यासाठी परवानगीचं पत्र दिलं. रझियाने एएनआयला सांगितलं की, स्थानिक पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी एकटीने स्कूटीवर 1400 किलोमीटर प्रवास केला. लॉकडाऊनच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अनेक ठिकाणी थांबवलंही, परंतु अधिकृत पत्रामुळे त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Russia Ukraine, Viral news

  पुढील बातम्या