मराठी बातम्या /बातम्या /देश /

पोटातला गर्भ वाढवायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकारी सर्वस्वी स्त्रीचा -कोर्टाने केलं स्पष्ट

पोटातला गर्भ वाढवायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकारी सर्वस्वी स्त्रीचा -कोर्टाने केलं स्पष्ट

आपल्या उदरात असलेला गर्भ वाढवायचा की गर्भपात करायचा, याचा निर्णय घेण्याचं स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.

आपल्या उदरात असलेला गर्भ वाढवायचा की गर्भपात करायचा, याचा निर्णय घेण्याचं स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.

आपल्या उदरात असलेला गर्भ वाढवायचा की गर्भपात करायचा, याचा निर्णय घेण्याचं स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.

कोची, 18 ऑगस्ट : गर्भातल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यात काही विकृती असण्याचा किंवा ते गंभीररीत्या विकलांग होण्याचा मोठा धोका असल्यास, गर्भपाताला कायदेशीर परवानगी असलेला कालावधी उलटून गेला, तरीही गर्भपात (Medical Termination of Pregnancy) करून घेण्याचा अधिकार आईला आहे, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने (Kerala Highcourt) नुकतीच केली आहे. तसंच, आपल्या उदरात असलेला गर्भ वाढवायचा की गर्भपात करायचा, याचा निर्णय घेण्याचं स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एका दाम्पत्याने केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ही टिप्पणी केली. 22 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा गर्भ उदरात असलेली स्त्री आणि तिचा पती यांच्या वतीने गर्भपाताची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. हा गर्भ वाढून बाळ जन्माला आल्यास आईच्या जिवाला धोका आहे. तसंच, बाळही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होण्याची शक्यता आहे, असं वैद्यकीय कारण देऊन ही गर्भपाताची मागणी करण्यात आली होती. छोट्याछोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा संबंधित याचिका दाखल करणारी महिला सौम्य प्रमाणात मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. तसंच, तिच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टर्सना असं आढळलं, की तिच्या उदरातल्या गर्भाला क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा विकार आहे. हा एक जनुकीय विकार (Genetic Condition) असून, त्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलग्यामध्ये एक्स गुणसूत्राची एक प्रत अतिरिक्त प्रमाणात आढळून येते. याला वैद्यकीय भाषेत क्रोमोझोमल अॅनोमॅली असं म्हटलं जातं. हा विकार असलेल्या मुलाला मानसिकदृष्ट्या विकलांगत्वाबरोबरच अंतस्रावी ग्रंथींशी (Endocrine Glands) निगडित शारीरिक विकार होतात. याचिकाकर्त्या महिलेला सौम्य मानसिक विकलांगत्व असून, तिला काही प्रमाणात दृष्टिदोषही आहे. तसंच, तिचा डावा पाय अधू असून, तिला 55 टक्के कायम स्वरूपाचं अपंगत्व (Disability) आहे. तिच्या उदरातल्या बाळाला असलेला क्लाइनफेल्टर सिंड्रोम (Klinefelter Syndrome) हा प्राणघातक विकार नाही; मात्र संबंधित महिलेचं अपंगत्व पाहता विकलांग बाळाच्या संगोपनाची जबाबदारी निभावणं तिला कठीण जाईल. या कारणांमुळे संबंधित महिलेल्या गर्भपाताची शिफारस करण्यात येत आहे, असं तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालात डॉक्टर्सनी लिहिलं होतं. जास्त झोपल्यामुळे कमी होतेय तुमची प्रजननक्षमता; अति झोपही खतरनाक डॉक्टर्सच्या या अहवालाच्या संदर्भाने कोर्टाने टिप्पणी केली, की उदरातला गर्भ वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेण्याचं महिलेचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, गर्भपाताचा कायदेशीर कालावधी उलटून गेला असला, तरी त्या बाळाच्या जन्मामुळे आईच्या जिवाला धोका असल्यास, तसंच बाळ विकलांग होण्याचा धोका असल्यास गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार आईला आहे. पाळीच्या काळात अस्वच्छतेमुळे होतो योनी मार्गात संसर्ग; ‘या’ पद्धतीने घ्या काळजी याचिकाकर्त्या स्त्रीच्या जोखमीवर तिने गर्भपात करवून घेण्यास हरकत नाही, अशा शब्दांत कोर्टाने तिच्या गर्भपाताला परवानगीही दिली.
First published:

Tags: Pregnant woman, Woman, Women

पुढील बातम्या