कचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...

महिलेचा वेंधळेपणा भोवला, ओल्या कचऱ्यासोबत गेले सोन्याचे दागिने.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 11:46 AM IST

कचऱ्यात फेकलेले दागिने बैलानं खाल्ले आणि आता...

सिरसा, 22 ऑक्टोबर: महिलेला ओल्या कचऱ्यासोबत सोन्याचे दागिने फेकणं चांगलंच भोवलं आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जावा असं वारंवार सांगूनही महिलेनं दोन्ही कचरा एकत्र टाकल्यामुळे त्यामध्ये सोन्याचे दागिनेही गेले. महिलेनं हा कचरा जवळच असलेल्या खाली कचरापेटीत टाकला. रस्त्यावर भटकणाऱ्या बैलानं त्यातील भाजी-पाला खाल्ला मात्र त्यासोबत सोन्याचे दागिने रवंथ करुन खाल्ल्याची अजब घटना समोर आली आहे.

सोनं नेमकं गेलं कुठे?

हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला. वॉर्ड नंबर 6मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील घरगुती समारंभ संपल्यानंतर पत्नी सूनेनं दागिने रात्री एका भांड्यात काढून ठेवली होते. दुसऱ्यादिवशी त्यामध्ये त्यांनी भाजी निवडली आणि त्यामध्ये नजरचुकीने दागिनेही ओल्या कचऱ्यात गेले. ओला कचरा टाकून आल्यानंतर बऱ्याच वेळाने दागिन्यांची आठवण झाली आणि मग शोधाशोध सुरू झाली. मात्र दागिने मिळाले नाहीत. कचऱ्यासोबत दागिने गेले असं ध्यानी येताच त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासण्यास सुरूवात केली.

इकडे महिलेनं फेकलेल्या ओल्या कचऱ्यावर रस्त्यावर भटकणाऱ्या बैलानं ताव मारल्या आणि कचऱ्यासोबत दागिनेही खाऊन मोकळा झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये दिसताच महिला आणि तिच्या कुटुंबियांनी बैलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. जवळपास 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बैलाला शोधण्यात यश आले.

बैल तर मिळाला पण सोनं कसं मिळणार?

Loading...

बैल तर मिळाला पण सोन्याचं काय हा प्रश्न कुटुंबियांपुढे होता. शेणातून आपल्याला सोनं मिळेल याची आशा आहे. त्यासाठी त्यांनी बैलाला आपल्या सोसायटीखाली बांधून ठेवलं आहे. हिरवा चारा, पाणी सगळी सोय केली आणि आता बैलाच्या शेणातून सोनं मिळण्याची वाट पाहात आहेत.

जर बैलाच्या शेणातून सोनं मिळालं नाही तर बैलाचं ऑपरेशन करुन सोनं काढावं लागेल असं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं. महिलेच्या बेजबाबदारपणाचा आणि वेंधळेपणाचा मोठा फटका बसला आहे.

बैलाच्या शेणातून सोनं मिळतं की बैलाचं ऑफरेशन करावं लागतं असा प्रश्न महिलेला पडला आहे. अनेकदा अशा वेंधळेपणामुळे मुक्या प्राण्यांचे जीव जाण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्याचा त्रास मात्र मुक्या प्राण्यांना होतो.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...