बेरोजगारीची तलवार! नोकरी जाईल या भीतीने 24 वर्षांच्या IT इंजिनीअर तरुणीने घेतला गळफास

बेरोजगारीची तलवार! नोकरी जाईल या भीतीने 24 वर्षांच्या IT इंजिनीअर तरुणीने घेतला गळफास

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 24 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीने नोकरी जाईल या नैराश्यापोटी आयुष्यच संपवलं. तिच्या कंपनीत layoffs होणार असं जाहीर करण्यात आलं होतं.

  • Share this:

हैदराबाद, 20 नोव्हेंबर : एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनीअर तरुणीने नोकरी जाईल या नैराश्यापोटी आयुष्यच संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही 24 वर्षांची तरुणी ज्या कंपनीत काम करत होती, तिथे Layoffs अर्थात नोकरकपात होणार असं जाहीर केलं होतं. या मध्ये आपलं नाव आलं आणि नोकरी गेली तर... या चिंतेत ही तरुणी होती. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं.

ती राहात असलेल्या लेडिस हॉस्टेलच्या पंख्याला गळफास अडकवून तिने आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मेहबूबनगर जिल्ह्यातली होती आणि हैदराबादमध्ये काम करत होती. याच कंपनीत ती गेली अडीच वर्षं ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करायची. तिच्या कंपनीने तिच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांना डिसेंबरमध्ये लेऑफ होऊ शकतात, असं सांगितलं होतं. तसं पत्र तिच्या हाती नुकतंच पडलं होतं. नोकरी जाण्याच्या भीतीने तिने हॉस्टेलच्या रूममध्येच पंख्याला गळफास घेतला.

30 नोव्हेंबर हा तिच्या नोकरीचा शेवटचा दिवस ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे तिने या बेरोजगारीचा धसका घेतला होता. या मुलीबद्दल अन्य माहिती अजून मिळालेली नाही.

मंगळवारी रात्री तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा या तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. देशभरात मंदीचे वारे वाहात असल्याचं चित्र आहे. अनेक मोठ्या आयटी कंपन्यांनीही कामगार कपात करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत.

------------------

अन्य बातम्या

1 जानेवारीपासून बदलणार सोनं खरेदीचा नियम, सरकारने दिली मंजुरी

कोण होणार मुख्यमंत्री? जेव्हा टॉस करून झाला होता हा निर्णय

नव्या नवरीला सरकारतर्फे एक तोळा सोनं फुकट; या राज्याने केली घोषणा

विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी

सेम टू सेम '3 इडियट्स'.. भररस्त्यावर गाडीत केली महिलेची डिलिव्हरी!

First published: November 20, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading