पती-पत्नी आणि ती ! अपूर्वानं 'या' कारणामुळं रोहित तिवारीची केली हत्या

पती-पत्नी आणि ती ! अपूर्वानं 'या' कारणामुळं रोहित तिवारीची केली हत्या

  • Share this:

डेहरादून, 25 एप्रिल : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारींची हत्या एखाद्या सिनेमाच्या कहाणी प्रमाणंच रचण्यात आल्याचं दिसत आहे. रोहित तिवारी यांची हत्या दुसरे-तिसरे कोणी नाही तर त्यांची पत्नी अपूर्वानंच केली आहे. अपूर्वा तिवारीनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिलेली नाही. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आणि अपूर्वाच्या नातेसंबंध गेल्या काही दिवसांमध्ये ताणले गेले होते आणि यामुळे दोघांचे प्रचंड वाददेखील सुरू होते.

ज्या दिवशी रोहित यांच्या हत्येचा कट रचण्यात आला त्यावेळेस ते नशेत होते. यादरम्यानच अपूर्वानं उशीच्या मदतीनं त्यांचं तोंड दाबलं आणि त्यांचा जीव घेतला. यानंतर तिनं पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो फसला. अपूर्वाकडून गुन्हा मान्य करून घेणं पोलिसांसाठी सोपं काम नव्हतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'अपूर्वानं अनेकदा वेगवेगळी विधानं करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपल्या वैवाहिक आयुष्यातील समस्या सांगण्यात सुरुवात केली. तिचं वैवाहिक आयुष्य चांगलं नव्हतं. तिच्या महत्त्वाकांक्षा- इच्छा पूर्ण होत नव्हत्या. याचा राग तिनं पतीचीच हत्या करून काढला'.

दारूचा ग्लास आणि महिला नातेवाईक

रोहित तिवारींची त्यांच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत असलेली जवळीकता अपूर्वाला आवडत नव्हती. यावरून तिनं अनेकदा थेट तसे बोलून दाखवलेदेखील होतं. पण यानंतरही ती महिला नातेवाईक कौटुंबिक कार्यक्रमांदरम्यान त्यांच्या निवासस्थानी येत होती. ही गोष्ट अपूर्वाला खटकत होती. हत्या होण्यापूर्वी रात्रीही त्यांचा चुलत भाऊ पत्नीसहीत तिवारींच्या निवासस्थानी आला होता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर दोघंही स्वतःच्या घरी निघून गेले. नातेवाईक गेल्यानंतर रोहित काही वेळासाठी आई आणि पत्नीसहीत बसले होते. पण थकवा जाणवू लागल्यानं ते आराम करण्यासाठी स्वतःच्या खोलीत गेले.

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री जवळपास 12.45 वाजण्याच्या सुमारास टीव्ही पाहिल्यानंतर अपूर्वाही आपल्या खोलीत गेली. तेव्हा तिचं रोहितसोबत भांडण झालं. यानंतर झोपेत असतानाच तिनं रोहितचं तोंड उशीच्या मदतीनं दाबलं.

अपूर्वा शुक्लाच्या बदलत्या विधानांमुळे आला संशय

रोहित तिवारी हत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अपूर्वा शुक्ला वारंवार वेगवेगळी विधानं करत होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हत्याकांड पूर्वनियोजित नसून रागाच्या भरात करण्यात आलेलं आहे.

VIDEO: NCP नगरसेविकेच्या पतीवर कुऱ्हाड, तलवारीनं सपासप वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading