धक्कादायक : महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं

एका ट्रॅफिक पोलिसाने महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधल्या अलप्पुझामध्ये ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2019 07:42 PM IST

धक्कादायक : महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं

अलप्पुझा(केरळ )15 जून : एका ट्रॅफिक पोलिसाने महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधल्या अलप्पुझामध्ये ही घटना घडली. या महिलेच्या घराजवळच तिला जाळण्यात आलं.

सौम्या पुष्पकरन असं महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. सौम्या यांना तीन मुलं आहेत आणि त्यांचे पती परदेशात काम करतात, असं मातृभूमी या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

कामावरून परतताना केलं कृत्य

सौम्या या संध्याकाळी कामावरून घरी परत येत होत्या तेव्हा अजाझ नावाच्या एका ट्रॅफिक पोलिसाने कारने त्यांच्या टू व्हीलरला धडक दिली आणि त्यांना खाली पाडलं. त्यांना पाहून सौम्या यांनी एका घरात आश्रय घेतला. अझाझ तिथे धडकला आणि त्याने सौम्या यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.

VIDEO: अभिनंदन यांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दिलं 'असं' उत्तर!

Loading...

सौम्या पुष्पकरन यांचा तिथेच जळून मृत्यू ओढवला. अजाझ हा ट्रॅफिक पोलीसही यात जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अलप्पुझा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. अजाझ याने हा हल्ला का केला हे अजून कळू शकलेलं नाही. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत.

महिलांची सुरक्षा धोक्यात

एका पोलीस अधिकाऱ्यावरच हा हल्ला झाल्याने महिला पोलीसही सुरक्षित नाहीत हेच या घटनेवरून दिसून येतं. त्यातही ज्याने नागरिकांचं संरक्षण करायचं त्या ट्रॅफिक पोलिसानेच हा हल्ला केला आहे.

==========================================================================================

VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...