महिला पोलीस अधिकाऱ्याने दान केले तिचे केस, कारण...

महिला पोलीस अधिकाऱ्याने दान केले तिचे केस, कारण...

अपर्णा लवकुमार या त्रिसूरच्या इरिंजलकुदा महिला पोलीस ठाण्यात वरिष्ठ सिव्हिल पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी याहीआधी कॅन्सर पीडितांचे विग बनवण्यासाठी केस कापले होते पण त्यावेळी खांद्यापर्यंत केस ठेवले होते. आता मात्र त्यांनी पूर्ण टक्कल करून आपले केस दान केले.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 26 सप्टेंबर : केरळमधल्या महिला पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार यांनी त्यांचे मोठे केस दान केले. कॅन्सरपीडितांसाठी त्यांनी त्यांचे केस कापले. जे लोक कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देतायत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मी हे केलं, असं त्यांनी सांगितलं.

अपर्णा लवकुमार या त्रिसूरच्या इरिंजलकुदा महिला पोलीस ठाण्यात वरिष्ठ सिव्हिल पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी याहीआधी कॅन्सर पीडितांचे विग बनवण्यासाठी केस कापले होते पण त्यावेळी खांद्यापर्यंत केस ठेवले होते. आता मात्र त्यांनी पूर्ण टक्कल करून आपले केस दान केले.

(हेही वाचा : PMC बँकेच्या खातेधारकांना दिलासा,आता काढू शकणार एवढे पैसे)

अपर्णा यांनी एवढी मोठी गोष्ट केली आणि तरीही त्याचा काहीच गाजावाजा केला नाही. याआधी मी जर कुणाला हे सांगितलं असतं तर त्याला विरोध झाला असता. त्यामुळेच मी सरळ केस कापण्यासाठी गेले, असं त्या म्हणाल्या.

कॅन्सरपीडितांसाठी मी पैसे देऊ शकत नाही पण एवढं तर नक्कीच करू शकते,असं त्यांचं म्हणणं आहे. अपर्णा यांनी त्यासाठी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी मागितली. काही दिवस टक्कल पडलं तरी चालेल, माझे केस पुन्हा येऊ शकतात पण आता गरजू लोकांना याचा फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं.

पुन्हा नवा आत्मविश्वास

कॅन्सरमुळे महिला, पुरुष आणि मुलांना त्यांचे केस गमवावे लागतात. यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. म्हणूनच त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देणं महत्त्वाचं आहे, असं अपर्णा यांचं मत आहे. त्यांनी त्यांचे मोठे केस त्रिसूरच्या कॅन्सर रिसर्च सेंटरला दान केले. 17 वर्षांपूर्वी पोलीस दलात रुजू झालेल्या अपर्णा बास्केटबॉल खेळाडू आहेत. मला पुढचा जन्म मिळाला तरी मी पोलीसच होईन कारण लोकांची सेवा करण्यासाठी ही चांगली संधी आहे, असं त्या म्हणतात.

==============================================================================================

मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य, पाहा LIVE VIDEO

First published: September 26, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading