रोहतक, 3 मार्च : विद्यापीठातले विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी कुलगुरूंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. त्याच वेळी तिथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपैकी काही जणांशी या विद्यार्थ्यांची वादावादी झाली. विद्यार्थ्यांशी झालेल्या हमरी-तुमरीचा एका महिला पोलिसाला एवढा राग आला की, तिने सरळ आपल्या पायातला बूट काढून विद्यार्थ्यांना मारायला सुरुवात केली. रोहतक इथल्या पंडित भगवतदयाल शर्मा हेल्थ युनिव्हर्सिटीतला हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॅमेऱ्यावर टिपला आणि आता तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.