बस चालकाला स्कूटी चालवणाऱ्या महिलेसमोर घ्यावी लागली माघार, VIDEO VIRAL

महिलेनं तिची गाडी इंचभरही मागे घेतली नाही तेव्हा बस चालकालाच अखेर नमतं घ्यावं लागलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 10:44 AM IST

बस चालकाला स्कूटी चालवणाऱ्या महिलेसमोर घ्यावी लागली माघार, VIDEO VIRAL

तिरुवअनंतपुरम, 29 सप्टेंबर : नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारण्यात येत आहे. गाडीच्या किंमतीपेक्षा दुप्पट दंड आकारल्याचे प्रकारही घडले आहेत. दरम्यान, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातच चुकीच्या बाजूने येणाऱ्या बसच्या आडवी महिला स्कूटी घेऊन उभा असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ केरळचा असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये एक महिला स्कूटीवर असून तिच्या बाजूने जात आहे. तर समोरच एक बस विरुद्ध दिशेने येत आहे. वाहतुकीच्या नियमांनुसार बस चुकीच्या लाइनमध्ये घुसल्यानं महिलेला राग आला. हे पाहून महिलेनं गाडी जागेवरच बसच्या आडवी थांबवली. महिलेनं असा पवित्रा घेतल्यानं बस चालकाला एका बाजूने बस वळवून न्यावी लागली. दरम्यान, महिलेनं तिची जागा सोडली नाही.

ज्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यानं म्हटलं की, जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा तुमच्याकडं एक वेगळीच ताकद असते. या महिलेनं तिची जागा इंचभरही न सोडता बस चालकाला धडा शिकवला. युजरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी महिलेचं कौतुक केलं आहे. तर असं करणं धोकादायक असू शकतं असंही म्हटलं आहे.

Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...