पाटणा 01 डिसेंबर : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. लग्नात लोक एकमेकांची शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन देतात. मात्र, लग्नाच्या काही घटना अशा असतात ज्या सगळ्यांनाच थक्क करून सोडतात. बिहारमधील असंच एक लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. यात केवळ 48 तासात महिलेनं 2 लग्न केली.
या घटनेत एका विवाहित महिलेने आधी आपल्या पतीला सोडून एका तरुणाशी लग्न केलं, जो तिचा भाचाच होता. मुलीचे कुटुंबीयही या लग्नाचे साक्षीदार झाले. अनिता देवी या महिलेनं सेटलमेंट लेटरमध्ये लिहिलं की, तिला तिचा पती डब्लू शर्माला सोडून नवीन प्रियकर संतोष कुमारसोबत राहायचे आहे. तिने स्वतःहून वरील निर्णय घेतला आहे. ती तिचा पहिला पती डब्लू शर्मावर कोणताही दावा करणार नाही.
बिहारमधील खगडिया जिल्ह्यातून हे प्रकरण समोर आले आहे. चौथम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालपा गावात राहणारा संतोष कुमार हा तरुण महेशखुंट पोलीस ठाण्याच्या काझीचक येथील आपल्या मामाच्या घरी जात असे. संतोषचे मामा मजुरीचे काम करतात. दरम्यान, संतोषचे त्याच्या मामीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले, त्यानंतर दोघांना गावकऱ्यांनी पकडले. मग पतीने स्वतःच दोघांचं लग्न लावून दिलं.
नवरीबाईने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली त्याची 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस
महेशखुंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजीचक गावातील अनिता कुमारी हिने प्रियकरासोबत समाजासमोर लग्न केले. मात्र प्रियकर आपल्या मामीला पत्नी म्हणून घेऊन घरी पोहोचताच त्याच्या घरच्यांनी विरोध केला. त्यानंतर महिलेचा प्रियकर संतोष महिलेला सोडून पळून गेला.. यानंतर, महिला अनिता देवी आपल्या पहिल्या पतीच्या घरी परतली, जिथे खूप प्रयत्नांनंतर पतीने तिला आपल्यासोबत ठेवण्यास होकार दिला. त्यानंतर, पतीने आपल्या पत्नीसोबत पुन्हा एकदा लग्न करून तिला स्विकारलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral news