मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात कोणत्या राज्यात मुलींचं लग्न कितव्या वर्षी होतं? महाराष्ट्राची स्थिती घ्या जाणून

देशात कोणत्या राज्यात मुलींचं लग्न कितव्या वर्षी होतं? महाराष्ट्राची स्थिती घ्या जाणून

marriage

marriage

भारतात कायद्याने मुलींचं लग्नाचं वय 18 वर्षे ठरवण्यात आलं आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींचं लग्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. दरम्यान, आता केंद्र सरकारने देशातील महिलांच्या विवाहाच्या वयाबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतात कायद्याने मुलींचं लग्नाचं वय 18 वर्षे ठरवण्यात आलं आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींचं लग्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. दरम्यान, आता केंद्र सरकारने देशातील महिलांच्या विवाहाच्या वयाबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत. पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये बहुसंख्य मुलींची लग्न वयाच्या 21व्या वर्षी किंवा त्याआधी लग्न केली जातात. जम्मू-काश्मीर आणि दिल्लीमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे केवळ 10 आणि 17 टक्के आहे. महाराष्ट्रातील 82.7 टक्के मुलींची लग्न वयाची 21 वर्षं पूर्ण झाल्यावह होतात, असं या सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बिहारने सर्वांत विकसित आणि शिक्षित केरळ राज्याची बरोबरी केली आहे. आकडेवारीच्या विश्लेषणातून असं समोर आलंय की 21 पेक्षा जास्त वयोगटात बिहार आणि केरळची स्थिती सारखीच आहे. देशाच्या ग्रामीण भागात जवळजवळ एक तृतीयांश महिलांची लग्न 18 ते 20 वर्षांच्या असतानाच होतात.

सरकारने 2020 सालची आकडेवारी जाहीर केली आहे. विविध वयोगटांतील महिलांच्या लग्नाबाबत नवीन आणि रंजक तथ्यं समोर आली आहेत. बिहार आणि केरळमध्ये 21 वर्षांनंतर सरासरी 72.6 टक्के महिलांनी विवाह केल्याची नोंद आहे. त्याचबरोबर सर्वांत उशिरा लग्न करण्याच्या बाबतीत जम्मू-काश्मीर अव्वल आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 90.7 टक्के महिलांचं लग्न वयाच्या 21 वर्षांनंतर होतं. या बाबतीत गुजरात दुसऱ्या (85.2 टक्के), उत्तराखंड तिसऱ्या (84 टक्के), पंजाब चौथ्या (83 टक्के) आणि महाराष्ट्र पाचव्या (82.7 टक्के) क्रमांकावर आहे. याची राष्ट्रीय सरासरी 70.5 टक्के आहे.

हेही वाचा -  सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार

ग्रामीण भारताची परिस्थिती

ग्रामीण भारतात सुमारे एक तृतीयांश महिलांचं लग्न वयाच्या 18 ते 20 या वयात होतं. देशाच्या ग्रामीण भागात विविध कारणांमुळे लग्नाचं सरासरी वय कमी असतं. मात्र, गेल्या काही वर्षांत यामध्ये लक्षणीय सुधारणा नोंदवण्यात आली आहे. आधी मोठ्या संख्येने मुलींची लग्न अगदी कमी वयात व्हायची, पण आता ही आकडेवारी खूपच कमी झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय.

केरळमध्ये 18 पेक्षा कमी वयात एकाही मुलीचं लग्न झालेलं नाही

भारतात मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलंय. कमी वयात लग्न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये केरळमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. त्याचबरोबर या बाबतीत झारखंड (5.8 टक्के) आघाडीवर आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा (4.7 टक्के) क्रमांक लागतो.

First published:

Tags: Central government, Marriage