UP: बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले, 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 04:48 PM IST

UP: बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले, 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत

संभल, 16 जुलैः उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील पाच लोकांनी महिलेवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा क्रुर प्रकार समोर आला आहे. गुन्नौर येथील पोलीस क्षेत्रअधिकारी अकील अहमद यांनी याबद्दल अधिक माहिती देताना म्हटले की, आराम सिंह नावाच्या व्यक्तीसह पाच लोक पीडितेच्या घरी गेले आणि महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेचा पती गाजियाबादमध्ये मजूरी करतो. तर पीडिता तिच्या 7 वर्षांच्या मुलीसोबत गावी राहत होती. पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी तिला कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली. पीडितेने घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली. काही वेळानंतर पुन्हा ते पाच लोक तिच्या घरी आले आणि बाजूला बनत असलेल्या मंदिराच्या परिसरात तिला घेऊन गेले. तिथे त्यांनी पीडितेला जिवंत जाळले. यातच तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने 100 नंबरवर फोन करण्याचा प्रयत्नही केला होता मात्र फोन वाजत राहिला पण कोणीही तो फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. या प्रकरणात आराम सिंह, महावीर, चरणसिंह, गुल्लू उर्फ भोना यांच्याविरोधात बलात्कार आणि खुनाचा आरोप लावण्यात आला आहे.

हेही वाचाः

...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close