• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तुरुंगातील पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेची उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

तुरुंगातील पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेची उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

तुरुंगात बंद असलेल्या पतीसोबत (Husband in jail) शारीरिक संबंध (sexual relation) ठेवण्याची मागणी करणारी याचिका एका महिलेनं हरियाणा उच्च न्यायालयात दाखल (Woman filed petition in high court) केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे...

 • Share this:
  गुरुग्राम, 20 मार्च: तुरुंगात बंद असलेल्या पतीसोबत (Husband in jail) शारीरिक संबंध (sexual relation) ठेवण्याची मागणी करणारी याचिका एका महिलेनं हरियाणा उच्च न्यायालयात दाखल (Woman filed petition in high court) केली आहे. संबंधित महिलेचा पती खूनासारख्या (Murder) गंभीर गुन्ह्यात तुरुंगात कैद आहे. तुरुंगात राहणाऱ्या व्यक्तीला आपली वंशावळ पुढे चालवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला माझ्या पतिसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित महिलेनं उच्च न्यायालयात केली आहे. याचिकाकर्ती महिलेची दखल घेऊन हरियाणा उच्च न्यायालयाने गृह खात्याला याबाबत उत्तर मागितलं आहे. हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यात तुरुंगवास गुरुग्राम न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेच्या पतीला हत्या आणि इतर गुन्ह्यांत दोषी ठरवलं आहे. संबंधित महिलेचा पती 2018 पासून भोंडसी जिल्हा तुरुंगात कैद आहे. यावेळी महिलाने आपल्या याचिकेत म्हटलं की, तिला बाळाची अपेक्षा आहे. त्यामुळे मला माझ्या पतीशी शारीरिक संबंध ठेवायचा आहे. याचिकाकर्त्या महिलेच्या वकीलाने सांगितलं की, मानवाधिकार कायद्यांनुसार तुरुंगात कैद असलेल्या व्यक्तीच्या महिलेला वंशावळ पुढे घेऊन जाण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानातील कलम 21 नुसार याचिकाकर्त्या महिलेला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. (वाचा - 'अल्पवयीनांना निर्वस्त्र न करता स्पर्श केला तर तो लैंगिक अत्याचार नाही', वादग्रस्त निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती) याप्रकरणी आता हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा गृह खात्याला नोटीस पाठवली आहे. तसंच संबंधित महिलेच्या याचिकेवर उत्तर मागितलं आहे. गृह खात्यानं अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी उच्च न्यायालयाने जसवीर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्याची आठवण करून दिली. तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांची वंशावळ वाढवण्यासाठी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत धोरण तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने सरकारनं काही धोरण तयार केलं आहे का? असा सवाल यावेळी अ‍ॅडव्होकेट अ‍ॅडिशनल जनरल यांनी न्यायालयात विचारला असून याबाबत हरियाणा गृह खात्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
  Published by:News18 Desk
  First published: