अपंग असली तरी घाबरली नाही, हिम्मतीनं भिडली, एका हातानं परतवला बिबट्याचा हल्ला

अपंग असली तरी घाबरली नाही, हिम्मतीनं भिडली, एका हातानं परतवला बिबट्याचा  हल्ला

पश्चिम बंगालमध्ये घडली पण एक अपंग असलेल्या चहाच्या मळ्यातील कामगार महिलेने बिबट्याचा निकरानी सामना केला.

  • Share this:

कोलकाता, 13 जानेवारी : देशातील घनदाट जंगल असलेल्या भागांत अनेकदा बिबटे मानवी वस्तीत शिरतात. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, नगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात तसंच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यासंबंधी बातम्या आपण वाचत असतो. कधीकधी वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यात यशस्वी ठरतात तर कधी तो त्यांना हुलकावणी देऊन पळून जातो. माणसाने जंगलात अतिक्रमण केल्यामुळे निर्माण झालेला संघर्ष अटळ आहे. अशीच घटना  पश्चिम बंगालमध्ये घडली पण एक अपंग असलेल्या चहाच्या मळ्यातील कामगार महिलेने बिबट्याचा निकरानी सामना केला.

पश्चिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात(Tea Garden) काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने(Leopard) हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु या धाडसी महिलेने हा हल्ला परतवून लावत आपला जीव वाचवला आहे. एक हात नसलेल्या या महिलेने एकटीने या बिबट्याशी निकराने लढा देत आपला जीव वाचवला. मंगळवारी जलपाईगुडी ( Jalpaiguri) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भटखावा नावाच्या चहाच्या मळ्यात काम करत असताना या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले.

हे वाचा-15 दिवसांत रुग्णांचा आकडा शंभरी पार; भारतात आता UK तील कोरोनाला रोखण्याचं आव्हान

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या घटनेनंतर महिलेला स्थानिक कामगारांनी उपचारासाठी लीलाबारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. या महिलेचे नाव लीला ओरॉन( Leela Oraon) असल्याचं समजतं. या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून तिची तब्येत स्थिर असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदिपान सरकार यांनी दिली. या महिलेच्या धैर्याला सलाम असल्याचे देखील डॉ. सरकार यांनी म्हटले.

दरम्यान, मानव आणि बिबट्यांमध्ये झडपा होण्याचे प्रमाण वाढले आहे. जलपाईगुडीमध्ये (Jalpaiguri) बिबट्याच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नसून १ जानेवारीला कारने दिलेल्या धडकेत 2 बिबटे आणि 5 जण जखमी झाले होते. मुख्य वन्यजीव वॉर्डन व्ही. के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी बनारहाट परिसरातील गेंदरापा टी इस्टेटजवळील राष्ट्रीय महामार्ग 31C वर ही घटना घडली होती. या घटनेत एका बिबट्याला पकडण्यात यश आले असून दुसरा बिबट्या चहाच्या मळ्यात पळून जाण्यात यशस्वी झाला. याचबरोबबर दुसऱ्या एका घटनेत डिसेंबरमध्ये सिलिगुडीच्या जवळ असलेल्या फणसीडेवा गावातील गावकऱ्यांनी बिबट्याला मारून मारून त्याचा जीव घेतला होता.

First published: January 13, 2021, 4:24 PM IST
Tags: kolkata

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading