35 हजार फूटावर झाला बाळाचा जन्म

एका स्त्रीनं विमान प्रवास करताना एका बाळाला जन्म दिला आहे.जेट एअरवेजचं हे विमान सौदी अरेबियातून कोच्चीला जात होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2017 12:40 PM IST

35 हजार फूटावर झाला बाळाचा जन्म

19 जून : 35000 फूटावर एका बाळाचा जन्म झाला हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना? पण हे खरं आहे.कारण एका स्त्रीनं विमान प्रवास करताना एका बाळाला जन्म दिला आहे.जेट एअरवेजचं हे विमान सौदी अरेबियातून कोच्चीला जात होतं. मात्र एका स्त्रीला प्रसववेदना जाणवू लागल्या. त्यामुळे विमानच्या कॅप्टनने ते विमान मुंबईच्या दिशेने वळवलं.

मात्र विमान 35000 फूटांवर असताना या स्त्रीला बाळ झालं.विमानात असलेल्या क्र्यू-मेंबर आणि विमानात प्रवास करत असण्याऱ्या स्त्रिया तिच्या मदतीस धावून आल्या आणि तिचं बाळंतपण केलं.विमान मुंबई विमानतळावर उतरवून या स्त्रीला आणि बाळाला मुंबईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलंय.बाळाची आणि महिलेची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलंय.

या बाळाला आता आयुष्यभर जेट एअरवेझकडून विमान प्रवास मोफत असणार आहे अशी घोषणा जेट एअरवेज प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...