या 6 महिला मोदींचा राजमार्ग करू शकतात आणखी खडतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आता देशातील या 6 महिलांनी आव्हान उभं केलं आहे.

  • Share this:

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे 2014 आणि 2016 प्रमाणे आता 2019मध्ये देखील ममतांसाठी महिला दिन लकी ठरणार का? हे पाहावं लागणार आहे.

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील मोदींना आव्हान दिलं आहे. सपा आणि बसपा एकत्र आल्यानं पंतप्रधानपदाचा मार्ग ज्या प्रदेशातून जातो त्या उत्तर प्रदेशमध्ये देखील मोदींना अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? यावर चर्चा होती. पण, सोनिया आता रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत.

प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून काँग्रेसनं मास्टर स्ट्रोक लगावला. काँग्रेसच्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक प्रियांका असल्यानं आता मोदींना उत्तर प्रदेशमध्ये मोठं आव्हान उभं राहिल्याचं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

पीडीपीच्या नेत्या आणि जम्मू - काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या देखील आता मोदींच्या ध्येय धोरणावर टिका करताना दिसत आहेत.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या कन्या एम. के. कनिमोळी या देखील मोदींपुढे आव्हान उभं करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या