Home /News /national /

''फोनवर कोणाशी बोलत होती'', पतीनं विचारताच महिलेनं विष पिऊन केली आत्महत्या

''फोनवर कोणाशी बोलत होती'', पतीनं विचारताच महिलेनं विष पिऊन केली आत्महत्या

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) एका महिलेनं आत्महत्या केली आहे.

    हिमाचल प्रदेश, 01 ऑक्टोबर: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) एका महिलेनं आत्महत्या केली आहे. क्षुल्लक कारणानं या महिलेनं आपलं जीवन संपवल्याचं समजतंय. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात (Kangra district) एका 32 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. या महिलेनं विष प्राशन (consumed poison) केलं आहे. महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट (suicide note) देखील लिहिली आहे. ज्यात तिनं आत्महत्येचं कारणही दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैजनाथच्या ग्रामपंचायत सेहलचे हे प्रकरण आहे. 32 वर्षीय विनीत महिलेनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. महिलेचा पती कारपेंटर आहे. पती अर्जुनने पोलिसांना सांगितलं की, बुधवारी रात्री विनीता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. यादरम्यान मी विनिताला विचारले की तू फोनवर कोणाशी बोलत होती. विचारल्यावर तिनं थेट विष पिऊन आत्महत्या केली. हेही वाचा- तेजस ठाकरेंची कमाल, नव्या संशोधनात आढळली अंध 'ईल'ची नवी प्रजाती  विनिताच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुसाईड नोटमध्ये विनितानं स्वतःच्या इच्छेनुसार विष सेवन केल्याचं तिनं त्यात लिहिलं आहे. हे असू शकतं आत्महत्येचं कारण असं म्हटलं जात आहे की, या घटनेमागचं कारण प्रेम प्रकरण असू शकते आणि याआधीही विनिताच्या पतीनं तिचा मोबाईल बऱ्याचवेळा काढून घेतला होता. पोलिसांनी मृत विनिताची बहीण ममताचीही चौकशी केली आहे. पोलीस प्रभारी ओम प्रकाश ठाकूर यांनी सांगितलं की, पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Himachal pradesh

    पुढील बातम्या