मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रेमविवाहानंतरही पतीचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर, पत्नीने बहिणीला ऑडिओ पाठवत उचलले टोकाचे पाऊल

प्रेमविवाहानंतरही पतीचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर, पत्नीने बहिणीला ऑडिओ पाठवत उचलले टोकाचे पाऊल

रीना हिने पाचवर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव करण सिंह असे आहे. प्रेमविवाहानंतर तिचा पती करण हा तिला मारहाण करायचा.

  • Published by:  News18 Desk
कोटा, 17 जुलै : राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीने ऑडिओ पाठवून आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने ऑडिओ बनवला आणि त्यात पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत त्यांना आत्महत्येला जबाबदार म्हटले आहे. रीना असे मृत महिलेचे नाव आहे. ती अहमदाबाद येथील रहिवासी होती. रीना हिने पाचवर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव करण सिंह असे आहे. प्रेमविवाहानंतर तिचा पती करण हा तिला मारहाण करायचा. तसेच त्याने याआधी तिला दोन लाखांची मागणीही केली आहे. तसेच पतीच्या दुसऱ्या तरुणींशी असलेल्या संबंधांमुळेही रीना मानसिक तणावात होती. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तिने तिच्या बहिणीला ऑडिओ पाठवून आणि घरात गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेनंतर रीनाची बहिण आणि वडील यांनी रीनाचा पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. मृताच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप - मृत रीना हिची बहीण शालिनी हिने सांगितले की, 5 वर्षांपूर्वी तिची मोठी बहीण रीना हिने कोटा येथील रहिवासी करण सिंहसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर एकदाही सासरच्यांनी रीनाला माहेरी पाठवले नाही. अनेकवेळा फोन करून रीनाला घरी आणण्यास सांगितले, मात्र, सासरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले. बहिणीचे म्हणणे आहे की, रीनाने मृत्यूपूर्वी एक ऑडिओ पाठवला. यामध्ये तिने तिच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे सांगितले होते. हेही वाचा - 80 वर्षांच्या सासऱ्याने केला 55 वर्षांच्या सुनेचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक प्रकार तसेच त्याला आता रीनासोबत राहायचे नव्हते आणि पूजा नावाच्या एका तरुणीसोबत त्याला पुढचे आयुष्य जगायचे होते. मृत रीना हिचा पती करण सिंह याने तिला अनेकवेळा मारहाण केली. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ केला. त्याचवेळी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
First published:

पुढील बातम्या