एका स्त्रीने दुसरीवर केला बलात्काराचा आरोप; ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

एका स्त्रीने दुसरीवर केला बलात्काराचा आरोप; ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

समलिंगी संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल दिल्याला महिनाही उलटत नाही, तोवर एका स्त्रीने दुसरीवर बलात्काराचा आरोप ठेवत तिला कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. दिल्लीत अशी पहिलीच तक्रार दाखल झालीये पण पोलिसांनी अद्याप या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर : सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ संदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्याला महिनाही उलटत नाही, तोवर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर बलात्काराचा आरोप ठेवत तिला कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. पण पोलिसांनी अद्याप या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला नाही.

दिल्लीत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारदार महिलेने दुसऱ्या एका महिलेवर आरोप केलाय की, ती 'सेक्स टॉय'चा वापर करून तिचा लैंगिक छळ करत असे. लैंगिक शोषणाबरोबरच वारंवार बलात्कार केल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे.

तक्रारदार महिला पूर्व भारतातून दिल्लीत काम करण्यासाठी आलेली आहे. तिने १९ वर्षाच्या दुसऱ्या एका स्त्रीविरोधात २ महिने डांबून ठेवून बलात्कार केल्याची तक्रार केलीये. पण दिल्लीच्या सीमापुरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या स्त्रीविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यास असमर्थता व्यक्त केली.

या तक्रारदार स्त्रीने News18ला दिलेल्या माहितीनुसार, "कोर्टात मॅजिस्ट्रेटसमोर या घटनेचा आणि तक्रारीचा उल्लेखही करू नको, असं पोलिसांनी मला सांगितलं. पण मी मात्र कोर्टात या बाईचं नाव घेतलं."

या तक्रारदार महिलेनं काही व्यवसाय सुरू करण्यासाठी घरून कर्ज घेतलं होतं आणि इतर पैशाची तजवीज करण्यासाठी ती गुंतवणूकदार शोधत होती. त्याच वेळी तिची गाठ राहुल आणि रोहित यांच्याबरोबर त्या महिलेशी पडली. "राहुल आणि रोहित यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्यावरून ते ब्लॅकमेल करत होते," असं या तक्रारदार महिलेनं सांगितलं.

या दोघांवरही पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. राहुलला अटक झाली असून तो तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. तर रोहित फरार आहे.

लैंगिक अत्याचार होत असताना ती दुसरी महिला उपस्थित होती, असं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे. "तिनेसुद्धा अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक आनंद घेतला आहे. म्हणून तिच्याविरोधातही बलात्काराचा गुन्हा दाखल व्हावा, अशी माझी इच्छा आहे," असं ती म्हणाली.

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निकालात कलम ३७७मध्ये असलेली समलैंगिक संबंध गुन्हा ठरवण्याची तरतूद रद्द केली. समलिंगी संबंध एकमेकांच्या संमतीने असतील तर तो गुन्हा नाही, असं न्यायालयाने सांगितलं.

या केसमध्ये आता या महिलेची या संबंधांना संमती होती का नाही हे सिद्ध करणं अवघड आहे, असं एका ज्येष्ठ वकिलानं News18शी बोलताना सांगितलं.

Section 377 : Supreme Court च्या ऐतिहासिक निर्णयातल्या 10 महत्वाच्या गोष्टी

सीमापुरी पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात संपर्क साधला असता, तिथल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणात तपास अद्याप सुरू आहे. एखाद्याच्या तक्रारीवरून अटक करणं ही फार अवघड गोष्ट नाही, पण कोर्टात सादर करण्यासाठी केसचा सर्व बाजूनी तपास होणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही गुन्हा नोंदवून कुणाला अटक करू शकत नाही."

तक्रारदार महिलेच्या वकील प्रियांका डागर या मात्र या प्रकरणी ३७७ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, याबाबत ठाम आहेत. "या केसमध्ये समलैंगिक संबंध अनैसर्गिक आहेत कारण यासाठी माझ्या अशीलाची संमती नव्हती. त्यामुळे या केसमध्ये ३७७ कलम लागलंच पाहिजे", असं अॅड. प्रियांका म्हणाल्या.

First published: October 3, 2018, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading