S M L

महू येथे लष्कराच्या रेंजवर स्फोट, दोन जवानांचा मृत्यू

अभ्यास आणि प्रशिक्षणावेळी अचानक झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला.

Updated On: Apr 4, 2019 07:49 PM IST

महू येथे लष्कराच्या रेंजवर स्फोट, दोन जवानांचा मृत्यू

इंदौर, 04 एप्रिल : बेरछा हेमा रेंजवर अभ्यासावेळी गुरुवारी एक दुर्घटना झाली. यात दोन जवानांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत 20 जवान जखमी झाल्याचे समजते. जखमींची नेमकी संख्या समजू शकली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेरछा फायरिंग रेंजमध्ये दुपारच्या सुमारास युद्ध कौशल्य अभ्यास आणि प्रशिक्षणावेळी मोटार फुटल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. यात 20 जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील काहींना दिल्लीला नेण्यात येणार असल्याचे समजते. जखमींपैकी 5 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
स्फोटानंतर घटनास्थळावर आग भडकली. त्याठिकाणी गवत असल्याने ही आग वाढत गेली. सध्या तरी याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

VIDEO : 'हमारे पास मोदीजी है', मुख्यमंत्र्यांची हिंदीतून टोलेबाजी


Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 07:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close