मराठी बातम्या /बातम्या /देश /

तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; संतापलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड

तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; संतापलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड

तंबाखू खाऊन साक्ष द्यायला गेलेल्या व्यक्तीला कोर्टाने अद्दल घडवली आहे. संतापलेल्या न्यायाधीशांनी साक्षीदाराला दंड ठोठावला आहे.

तंबाखू खाऊन साक्ष द्यायला गेलेल्या व्यक्तीला कोर्टाने अद्दल घडवली आहे. संतापलेल्या न्यायाधीशांनी साक्षीदाराला दंड ठोठावला आहे.

तंबाखू खाऊन साक्ष द्यायला गेलेल्या व्यक्तीला कोर्टाने अद्दल घडवली आहे. संतापलेल्या न्यायाधीशांनी साक्षीदाराला दंड ठोठावला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: एखाद्या प्रकरणात न्यायालयात जाऊन साक्ष द्यायची म्हटलं की, अनेकांना घाम फुटतो. साक्ष देण्यासाठी उभं राहिल्यानंतर वकिलांनी विचारलेल्या प्रश्न ऐकूनच अनेकांची बोबडी वळते. असं असतना एका प्रसिद्ध खून खटल्यात साक्षीदार म्हणून बोलावण्यात आलेला व्यक्ती तंबाखू खाऊन न्यायालयात गेल्याची (witness chewing tobacco during court Hearing) घटना उघडकीस आली आहे. तंबाखू खाऊन साक्ष देण्यासाठी न्यायालयात गेलेल्या साक्षीदाराचं कृत्य पाहून न्यायाधीशही त्याच्यावर भडकले आहेत. तोंडात तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात नीट बोलताही येत (not speak clearly) नव्हतं.

एवढंच नाही तर जे काही तोडक्या मोडक्या आवाजात बोलत होता. ते न्यायधीशांनी देखील कळत नव्हतं. त्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी संबंधित साक्षीदाराला दंड ठोठावला (judge fined witness) आहे. ही घटना वकील शाहीद आझमी यांच्या खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान घडली आहे. साक्षीदार तंबाखू खाऊन आल्याने बराच वेळ न्यायालयातील तापमान वाढलं होतं.

हेही वाचा-पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा कांड; पहिलं लग्न होऊनही महिला पोलीस ऑफिसरशी घरोबा

नेमकं काय घडलं?

वकील शाहीद आझमी यांच्या खून प्रकरणी साक्ष देण्यासाठी एका साक्षीदाराला न्यायालयात बोलावण्यात आलं होतं. मात्र संबंधित साक्षीदाराच्या तोंडाच तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तो नेमकं काय बोलत आहे, हे कोणालाही कळत नव्हतं. त्यामुळे न्यायाधीशांचा संताप अनावर झाला होता. न्यायालयीन प्रक्रियेशी साक्षीदाराचं काहीही देणं घेणं नसल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवून त्याला 100 रुपयांचा दंड ठोठावला.

हेही वाचा-दारूच्या नशेत आईसोबत भलतंच कृत्य; तरुणाने शेजाऱ्याचा गळा चिरून संपवलं

यावेळी सरकारी वकिलांनी साक्षीदाराची बाजू मांडत न्यायालयाला सांगितलं की, साक्षीदार हा गरीब घरातली असून, त्याला न्यायालयाच्या नियमांबद्दल फारशी माहिती नाहीये. पण न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तिवाद अमान्य करत साक्षीदाराला 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

First published:

Tags: Court, Crime news