या देशानं बनवलं अनोखं कंडोम; पार्टनरशिवाय उघडणार नाही पाकीट

या देशानं बनवलं अनोखं कंडोम; पार्टनरशिवाय उघडणार नाही पाकीट

पार्टनरची संमती नसेल तर कंडोमचं पाकीट उघडणार नाही असं कंडोम अर्जेटिनातील कंपनीनं तयार करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : शरीरसंबंधांसाठी जोडीदाराची पण सहमती गरजेची असते. स्त्री – पुरूष या दोघांचीही संमती नसेल तर शरीरसंबंध ठेवणं चुकीचं असल्याचं मत जाणकार व्यक्त करतात. पण, अनेकवेळी स्त्रीच्या संमतीचा विचार केला जात नाही. त्याबाबत पुरूषांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम सुरू आहे.

अनेक उपक्रम देखील राबवले जात आहेत. पण, अर्जेटीनाच्या कंपनीनं असा कंडोम तयार केला आहे ज्याचं पाकिट उघडण्यासाठी चार हातांची गरज पडते. चार हातांची गरज पडते म्हणजेच शरीरसंबंधांपूर्वी स्त्रीनं हात लावल्यानंतर कंडोमचं पाकीट उघडलं जातं. त्यामुळे सध्या या कंडोमबद्दल अर्जेटीनामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

ही टीव्ही अ‍ॅक्टर आहे राहुल गांधी यांच्या प्रेमात; फोटो शेअर करत म्हणाली...

कसा आहे हा कंडोम

शरीरसंबंधासाठी तुमच्या पार्टनरची संमती देखील हवीच. तिची संमती असेल तरच शरीरसंबंधापूर्वी तिनं कंडोमच्या पाकीटाला हात लावल्यानंतर कंडोमचं पाकीट उघडतं. अर्जेटीनातील ट्युलीपन कंपनीनं हा कंडोम तयार केला असून त्याचं नाव 'कंसेट पॅक' अर्थात 'सहमतीवाला पॅक' असं ठेवलं आहे.

अडल्ट टॉय आणि कंडोम बनवण्याचं काम कंपनी करते. कंपनीनं कंडोमची जाहीरात केली असून  'हा तर हो नाहीतर नाही.' तसेच 'सहमतीशिवाय आनंद नाही' असं कंपनीनं आपल्या टॅग लाईनमध्ये म्हटलं आहे.

कंडोमच्या पाकिटाला चार बटन आहेत. ही चारही बटणं एकत्र दाबावी लागता. त्यानंतर कंडोमचं पाकीट उघडतं. त्यामुळे सध्या अर्जेटीनामध्ये तरी या कंडोमचीच चर्चा सुरू आहे.

VIDEO : गिरीश महाजन पुन्हा चर्चेत, लेझीम खेळत ट्रॅक्टरही चालवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: condom
First Published: Apr 14, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading