• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • ...तर नरेंद्र मोदी वाराणशीतूनही निवडून येणार नाहीत – राहुल गांधी

...तर नरेंद्र मोदी वाराणशीतूनही निवडून येणार नाहीत – राहुल गांधी

सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणशी मतदारसंघातूनही निवडून येणार नाहीत अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. हवा बदलत आहेत, विरोधक एकत्र येत आहेत आणि 2019 मध्ये परिवर्तन होणार आहे असं भाकितही राहुल गांधी यांनी वर्तवलं.

  • Share this:
बंगळूरू,ता.08 एप्रिल : सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणशी मतदारसंघातूनही निवडून येणार नाहीत अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. हवा बदलत आहेत, विरोधक एकत्र येत आहेत आणि 2019 मध्ये परिवर्तन होणार आहे असं भाकितही राहुल गांधी यांनी वर्तवलं. कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या सहाव्या टप्प्यात राहुल गांधी सध्या कर्नाटकमध्ये आहेत. एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं. विरोधीपक्ष एकत्र आलेत तर काय होतं हे उत्तरप्रदेशात लोकसभेच्या पोटनिवडणूकीत दिसलं आहे आणि 2019 मध्येही त्याची पुनरावृत्ती होणार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये प्रचंड असंतोष असून दलित संघटनांच्या आंदोलनातून तो उद्रेक बाहेर पडल्याचही ते म्हणाले. कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच विजयी होणार असल्याचही ते म्हणाले.
First published: