MBBS ची खोटी पदवी घेऊन तोतया डॉक्टरने केली 10 वर्षांत 70000 ऑपरेशन्स

MBBS ची खोटी पदवी घेऊन तोतया डॉक्टरने केली 10 वर्षांत 70000 ऑपरेशन्स

एका तोतया डॉक्टरने बनावट MBBS पदवीच्या जोरावर एक -दोन नव्हे तर 10 वर्ष 'प्रॅक्टिस' केली आणि रीतसर सरकारी रुग्णालायात सेवा देण्यासाठी नोंदणीही केल्याची घटना उघड झाली आहे.

  • Share this:

सहारनपूर (उत्तर प्रदेश), 1 ऑक्टोबर : एका तोतया डॉक्टरने एक -दोन नव्हे तर 10 वर्ष 'प्रॅक्टिस' केली आणि रीतसर सरकारी रुग्णालायात सेवा देण्यासाठी नोंदणीही केल्याची घटना उघड झाली आहे. MBBS ची बनावट पदवी या तोतयाने पैदा केली आणि त्याच्या जोरावर 10 वर्षं डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली. 70000 ऑपरेशन्सही त्यानं केली. पोलिसांनी या तोतया डॉक्टरला अटक केली आहे. ही घटना आहे उत्तर प्रदेशातली आहे.

आरोपी ओम पाल शर्मा हा उत्तर प्रदेशचाच रहिवासी आहे. त्यानं कर्नाटकातल्या एका डॉक्टरच्या नावाचा उपयोग करून बनावट डिग्री आणि दस्तावेज तयार केले. कर्नाटक मेडिकल कौन्सिलमध्ये त्याने नोंदणीही केली. या फेक डिग्रीच्या जोरावर तो उत्तर प्रदेशात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू लागला. एवढंच नाही तर आयुष्मान भारतसारख्या सरकारी योजनेतही त्यानं नोंदणी केली होती. सरकारी हॉस्पिटललाही तो काँट्रॅक्ट बेसिसवर सेवा देत होता.

सहारणपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूला राहणाऱ्या आणि प्रॅक्टिस करणाऱ्या आर. राजेश या डॉक्टरच्या पदवीचा गैरवापर करून त्यापासून शर्माने आपल्या नावाची खोटी सर्टिफिकेट करून घेतली.

हे वाचा - उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप अडचणीत, 'या' जागांवर बंडखोरीची शक्यता

खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनही केलं आणि त्याआधारे हा तोतया डॉक्टर रुग्णांना 'सेवा' देत पैसे मिळवत राहिला. त्यानं 70 हजार शस्त्रक्रियाही केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत.

पाहा हा VIDEO - हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ!

-------------------------

VIDEO : उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर केला खुलासा

First published: October 1, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading