संसदेचे अधिवेशन 15 डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन दर वर्षी दिवाळी नंतर दोन आठवड्यांनी घेतलं जातं. यावर्षी 5 जानेवारीपर्यंत हे अधिवेशन चालण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2017 09:35 AM IST

संसदेचे अधिवेशन 15 डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता

 दिल्ली ,23 नोव्हेंबर: गेले अनेक दिवस चर्चेत असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे. गुजरात निवडणुकांमुळे हे अधिवेशन पुढे ढकललं असल्याची टीका होते आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन दर वर्षी दिवाळी नंतर दोन आठवड्यांनी घेतलं जातं. यावर्षी 5 जानेवारीपर्यंत हे अधिवेशन चालण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संसदेचं अधिवेशन कधी सुरू होणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. गुजरातमध्ये 8 आणि 13 डिसेंबरला मतदान होणार आहे नोटाबंदी, जीएसटीसारख्या कठीण विषयांवर विरोधक सरकारला घेरू शकतं गुजरातच्या रणधुमाळीत हे शक्यतो सरकारला टाळायचं होतं ते टाळण्यासाठी सरकारची चालढकल सुरू केली असा विरोधकांचा दावा आहे. संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले यावरून सोनिया गांधीनींही सरकारवर टीका केली आहे.

या अधिवेशनात ट्रिपल तलाक ,नागरिकत्व कायदा असे अजून कायदे चर्चेत असणार आहेत. तर दुसरीकडे नोटाबंदी,जीएसटी, जय शहाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास विरोधक तयारीत असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...