आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; जीएसटी नोटाबंदी महत्त्वाचे मुद्दे

जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.तसंच या अधिवेशनात तिहेरी तलाकसारखे विधेयकही सरकार सभागृहात आणण्याच्या तयारीत आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 09:16 AM IST

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; जीएसटी नोटाबंदी महत्त्वाचे मुद्दे

15 डिसेंबर: आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

तसंच या अधिवेशनात तिहेरी तलाकसारखे विधेयकही सरकार सभागृहात आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, काल गुजरात निवडणुकांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीमुळं आता विरोधकही चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत.

काल मोदींनी मतदान करण्यासाठी आले असता अहमदाबादमध्ये रोड शो केला असा विरोधकांचा आरोप आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही म्हणून काल निवडणूक आयोगाविरूद्ध आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यामुळे यामुद्द्यावरून विरोधक गदारोळ घालण्याची शक्यता आहे.

तसंच गुजरातच्या निवडणूकांमध्ये कायम नोव्हेंबरमध्ये सुरू होणारं अधिवेशन सरकारनं पुढे ढकललं असा आरोपही सरकारवर करण्यात येतो आहे. त्यामुळे या अधिवेशनात आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...