S M L

प्रचंड पैसा खर्च पण नव्या खासदारांचा कार्यकाळ मात्र फक्त वर्षभराचा

देशात 10 ठिकाणी पोटनिवडणूका झाल्यात. या पोटनिवडणूकीत जे खासदार निवडून आलेत त्यांचा कार्यकाळ हा फक्त वर्षभराकरीता राहणार आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 31, 2018 02:47 PM IST

प्रचंड पैसा खर्च पण नव्या खासदारांचा कार्यकाळ मात्र फक्त वर्षभराचा

नवी दिल्ली,ता.31 मे: देशात 10 ठिकाणी पोटनिवडणूका झाल्यात. या पोटनिवडणूकीत जे खासदार निवडून आलेत त्यांचा कार्यकाळ हा फक्त वर्षभराकरीता राहणार आहे. प्रचंड खर्च, राजकीय संघर्ष आणि आकाश पाताळ एक करून फक्त वर्षभराची खासदारकी या नव्या खासदारांना मिळणार आहे.

पण राजकारणात विजय मिळवणं हे महत्वाचं असल्यानं भविष्याचं राजकारण लक्षात घेऊन राजकीय नेते हा डाव खेळायला तयार होतात. वर्षभरानंतर 3 जूनला 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असून या खासदारांचा कार्यकाळही संपणार आहे.

लोकप्रतिनिधी कायदा 151-अ नुसार लोकसभा किंवा विधानसभेची जागा रिकामी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत तिथे निवडणूक घ्यावी लागते. कलम 147, 149, 150 आणि 151 नुसार कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावीच लागते. लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ वर्षभरापेक्षा कमी राहिला असेल तर अशा ठिकाणी आयोग निवडणूका घेणं टाळतं. पण वर्षाभराचा कार्यकाळ राहिला असेल तर मात्र आयोग अशा ठिकाणी निवडणूका घेत असते.

गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या पोटनिवडणूका

2014 - लोकसभा आणि विधानसभेच्या 64 जागांवर निवडणूका

2015 - 23 जागांवर, दोन लोकसभेच्या जागा

2016 - 28 जागांवर, दोन लोकसभेच्या जागा

2017 - 21 जागांवर, दोन लोकसभेच्या जागा

2018 - मार्च मध्ये 15 जागांवर पोटनिवडणूका झाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2018 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close