पाकिस्तानमध्ये उतरताच गिळले नकाशे; अभिनंदनच्या शौर्याला सलाम

पाकिस्तानमध्ये उतरताच गिळले नकाशे; अभिनंदनच्या शौर्याला सलाम

पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांना कसं पकडलं? याचा वृत्तांत पाकिस्तानातील डॉन या वृत्त पत्रानं दिला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 28 फेब्रुवारी : भारताचे विंग कमांडर अभिनंदन  यांची अखेर  उद्या ( शुक्रवारी ) सुटका होणार आहे. भारताचं हे खूप मोठं यश आहे.  दरम्यान, अभिनंदन यांना पकडलं कसं? ते पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात गेले कसे? त्यांना कुणी मारलं? असे एक ना अनेक सवाल आता विचारले जात आहेत. त्यासंदर्भात पाकिस्तानमधल्या प्रत्यक्षदर्शींनं संपूर्ण कहाणी सांगितलं आहे. 'डॉन' या वृत्तपत्रानं याबाबतचा 'आखों देखा हाल' सांगितला आहे. तो वाचल्यानंतर तुम्हच्या तोंडून देखील 'अभिनंदन आम्हाला तुमचा गर्व आहे'! असे शब्द बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.

विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं कसं पकडलं?

भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाकिस्ताननं भारतावर एफ-16 विमनाच्या साथीनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलाच्या मिग - 21 विमानांनी पाठलाग करत पाकिस्तानला गर्व असलेल्या एफ -16 विमानांना पिटाळून लावलं. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन देखील आघाडीवर होते. पाकच्या विमानाचा पाठलाग करता करता अभिनंदन यांच्या मिग -21 विमानानं पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. अभिनंदन यांना याचं भान नव्हतं. समोर दिसत होतं ते केवळ एफ-16!

हल्ल्या - प्रतिहल्ल्याचा हा खेळ हवेत सुरू होता. सकाळी 8.45 मिनिटांचा हा घटनाक्रम. या मोक्याच्या वेळी अभिनंदन यांच्या विमानातून धूर येऊ लागाला आणि विमानानं पेट घेतला. अखेर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या साहाय्यानं उडी मारली.

पाकिस्तानच्या किल्लान गावातील रझ्झाक हे ग्रामस्थ हवेत रंगलेला हा सारा थरार पाहत होते. अभिनंदन यांना पॅराशूटच्या साहाय्यानं उतरताना पाहून त्यांनी तडक गावात धाव घेत गावकऱ्यांच्या कानावर हा सारा थरार घातला. काहींनी लगेच पाकिस्तानी सैन्याला याबद्दलची माहिती दिली. दरम्यानच्या काळात अभिनंदन जमिनिवर सुखरूप उतरले होते. त्याचवेळी गावकऱ्यांच्या गराडा त्यांच्या भोवती पडला. स्थानिकांनी त्यांना पकडून ठेवलं.

भारतीय पायलट अभिनंदन यांच्याबाबत मोठी बातमी, पाकिस्तान तडजोडीला तयार

हिंदुस्तान झिंदाबादची घोषणा

त्यांनी स्थानिकांना विचारलं हे पाकिस्तान कि हिंदुस्तान? तेवढ्यात गराड्यातील एकानं शिताफीनं उत्तर दिलं, हिंदुस्तान! यानंतर मात्र अभिनंदन यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी थेट हिंदुस्थान झिंदाबादचा नारा द्यायला सुरूवात केली. यावेळी संतापलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला केला. मग बचावासाठी अभिनंदन यांनी पिस्तुल काढत हवेत फायरिंग केली. तर गावातील तरूणांनी हातात दगड घेतले.

अभिनंदन यांची शिताफी आणि पाकिस्तानचे हात रिते!

बचावासाठी अभिनंदन अर्धा किमी पळाले. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. पळता पळता त्यांनी एका तळ्यात उडी घेत जवळील कागदपत्र गिळून टाकले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. काही काळानंतर पाकिस्तानी लष्कर दाखल झाले. त्यांनी अभिनंंदन यांना त्याब्यात घेतलं. पण, केवळ नशीब बलवत्तर म्हणून चिडलेल्या तरूणांनी त्यांची हत्या केली नाही, असंही प्रत्यक्षदर्शी रझ्झाक यांनी सांगितलं.

SPECIAL REPORT : पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर?

First published: February 28, 2019, 3:42 PM IST

ताज्या बातम्या