India-Pak Tensions LIVE: विंग कमांडर अभिनंदच्या वडिलांचा भावनिक संदेश

India-Pak Tensions LIVE: विंग कमांडर अभिनंदच्या वडिलांचा भावनिक संदेश

विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी आता देशाला भावनिक संदेश लिहिला आहे. यामध्ये त्यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत.

  • Share this:

दिल्ली, 28 फेब्रुवारी : विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मिग -21 क्रॅश झाल्यानंतर अभिनंदन पाकच्या हद्दीत उतरले. त्यानंतर त्यांना स्थानिकांनी मारहाण करत सैन्याच्या ताब्यात दिलं. विंग कमांडर अभिनंदन यांचे काही व्हिडीओ देखील आता व्हायरल झाले आहेत. यावरून अभिनंदन खंबीर असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, अभिनंदन यांचे वडील माजी एअर मार्शल एस. वर्द्धमान यांनी आता समस्त देशवासियांना संदेश लिहिला आहे. यामध्ये, 'अभिनंदनप्रति चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार. मी देवाला धन्यवाद देतो की, अभिनंदन सुखरूप आहे. तो जखमी नाही. शिवाय, तो अत्यंत हुशारीनं एका सैनिकाला शोभेल अशा पद्धतीनंच बोलत आहे. आम्हाला त्याचावर गर्व आहे. त्याचा छळ न होता तो सुखरूप देशात परत येईल हीच अपेक्षा. देशवासियांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आम्हाला ऊर्जा मिळत आहे. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

माजी एअर मार्शल एस. वर्द्धमान यांनी आपल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या माध्यमातून हा निरोप देशवासियांपर्यंत पोहोचवला आहे.


भारतानं पाडलेल्या पाकिस्तानच्या F-16 विमानाचा पहिला फोटो आला समोर


पाकच्या ताब्यात विंग कमांडर अभिनंदन

मिग - 21 विमान क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. यावेळी पाकिस्तानकडून दोन व्हिडीओ जारी करण्यात आले. एकामध्ये त्यांना स्थानिक मारहाण करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये अभिनंदन चहा पिताना पाकिस्तानच्या प्रश्नांना अंत्यत हुशारीनं उत्तर देताना दिसत आहेत. यामध्ये त्यांच्या आत्मविश्वास देखील दिसून येत आहे.

सुटकेसाठी प्रयत्न सुरू

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी आता भारतानं प्रयत्न सुरू आहेत. पाकच्या उच्चायुक्तांना त्याबद्दल समन्स देखील बजावण्यात आलं आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची तयारी दर्शवली आहे. 'परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू' असं विधान त्यांनी केलं आहे.

VIDEO : काय आहे जीनिव्हा करार? सांगत आहेत उज्ज्वल निकम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या