विंग कमांडर अभिनंदन मिग विमानातून पुन्हा घेणार भरारी

विंग कमांडर अभिनंदन मिग विमानातून पुन्हा घेणार भरारी

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचं F - 16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन हवाईदल प्रमुख बी.एस. धानोआ यांच्यासोबत मिग विमानातून उड्डाण करणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते हे उड्डाण करतील.

  • Share this:

दिल्ली, 27 ऑगस्ट : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचं F - 16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन हवाईदल प्रमुख बी.एस. धानोआ यांच्यासोबत मिग विमानातून उड्डाण करणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते हे उड्डाण करतील.

भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये झालेल्या संघर्षात पाकिस्तानचं F - 16 विमान पाडल्यानंतर अभिनंदन यांचं मिग - 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले पण नंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं. या घटनेत जखमी झाल्यामुळे अभिनंदन लढाऊ विमान उडवू शकले नव्हते. आता मात्र ते फिट असल्यामुळे राजस्थानमधल्या हवाई दलाच्या तळावर त्यांची नेमणूक झाली आहे. आता त्यांनी पहिल्यासारखंच विमान उडवायला सुरुवात केली आहे.

बंगळुरूमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीन या संस्थेमध्ये अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा विमान उडवण्याची परवानगी देण्यात आली.

उपमुख्यमंत्रीपद घेणार का? आदित्य ठाकरेंच्या उत्तराने सस्पेन्स कायम!

वीरचक्र पुरस्काराने सन्मान

36 वर्षांचे विंग कमांडर अभिनंदन यांना त्यांच्या कामगिरीबद्दल वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये हल्ला केला आणि तिथले दहशतवादी तळ उद्धवस्त केले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने भारतात्या सीमेत घुसून एफ-16 विमानांनी हल्ला चढवला.

विंग कमांडर अभिनंदन आणि त्यांच्यासोबतच्या पाच वैमानिकांनी भारताच्या हद्दीत घुसलेल्या एफ-16 विमानांना परतवून लावलं होतं. या घटनेनंतर विंग कमांडर अभिनंदन देशभरातल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा लढाऊ विमान उडवून शौर्य गाजवावं, अशीच सगळ्यांची इच्छा आहे.

===========================================================================================

Mission paani: ...म्हणून अमिताभ आहेत महानायक; मुख्यमंत्र्यांनी बिग बी यांचं केलं कौतुक

Published by: Arti Kulkarni
First published: August 27, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading