अभिनंदन जाणार सुट्टीवर, पण कुटुंबीयांसोबत नाही तर या ठिकाणी

या काळात त्याला काही चाचण्याही द्याव्या लागतील. त्या पूर्ण झाल्या की त्याला पुन्हा लढाऊ विमानांच्या उड्डाणाची परवानगी द्यायची का याचा निर्णय अधिकारी घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 08:25 PM IST

अभिनंदन जाणार सुट्टीवर, पण कुटुंबीयांसोबत नाही तर या ठिकाणी

नवी दिल्ली 26 मार्च : आपल्या शौर्याने लष्कराचं नाव उंचावणारा विंग कमांडर अभिनंदन उपचारानंतर आता पूर्ण बरा झालाय. दिल्लीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर त्याला चार आढवड्यांची सुट्टी मिळाली आहे. या काळात कुटुंबीयांसोबत किंवा त्याच्या मनाप्रमाणे तो ही सुट्टी घालवू शकतो. या पठ्ठ्याने चेन्नईला घरी न जाता काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतलाय.

पाकिस्तानातून परतल्यानंतर लष्कराच्या नियमांप्रमाणे त्याची चौकशी झाली आणि उपचार करण्यात आले. त्याच्यामुळे अभिनंदन आता मोकळा झालाय. चेन्नईला त्याचे आई वडिल आणि पत्नी राहते. ही सुट्टी तो त्यांच्यासोबत राहून घालवू शकला असता. पण त्याने पुन्हा श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतलाय. तो आपल्या स्कॉड्रनमध्ये परतणार असून सहकारी मित्रांसोबतच राहण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतलाय.या काळात त्याला काही चाचण्याही द्याव्या लागतील. त्या पूर्ण झाल्या की त्याला पुन्हा लढाऊ विमानांच्या उड्डाणाची परवानगी द्यायची का याचा निर्णय अधिकारी घेणार आहेत. 28 फेब्रुवारीला अभिनंदनच्या सुटकेची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. त्यानंतर 1 मार्चला वाघा सीमेवरून तो भारतात परतला होता.

Loading...

अभिनंदन कसे पोहोचले होते पाकिस्तानात?

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांना पिटाळून लावत असताना भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग - 21 बुधवारी क्रॅश झाले होते. यानंतर त्यांनी पॅरेशूटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. येथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. गुरुवारी (28 फेब्रुवारी)पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले होते. पण, खरंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढला होता.

नेमकी काय आहे घटना?


- पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

- पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

- पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

- त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

- पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

- पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

- संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

- नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

- आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांना सोडाव लागलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...