अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51चा होणार विशेष सन्मान!

अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51चा होणार विशेष सन्मान!

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman)यांच्या स्क्वाड्रन 51चा विशेष सन्मान केला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: बालाकोट(Balakot) एअरस्ट्राइक(Airstrike)नंतर पाकिस्तान(Pakistan)कडून झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman)यांच्या स्क्वाड्रन 51चा विशेष सन्मान केला जाणार आहे. एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदोरिया यांच्याकडून अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. त्याच बरोबर स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल (squadron leader minty agarwal)यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अग्रवाल यांनी बालाकोट येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमीका पार पाडली होती. बालाकोट येथील मोहीम गुप्त ठेवण्यासाठी त्याचे नाव 'ऑपरेशन बंदर' असे ठेवण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटयेथे सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा नायनाट केला होता. एअल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाडले होते. ही कामगिरीपार पाडत असताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. पाकने त्यांना दोन दिवस ताब्यात ठेवले होते. त्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्याने पाकने त्यांची सुटका केली. अभिनंदन यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका

बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याआधीच त्यांना युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी मिंटी अग्रवाल यांनी पाकिस्तानी वैमानिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते.

First published: October 6, 2019, 1:01 PM IST
Tags: abhinandan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading