भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला, विंग कमांडर अभिनंदनची उद्या होणार सुटका

भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला, विंग कमांडर अभिनंदनची उद्या होणार सुटका

कंदहार विमान अपहरणाच्या वेळी जसा भारतावर दबाव होता तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविला.

  • Share this:

इस्लामाबाद 28 फेब्रुवारी : भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर  विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.


जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं.


कंदहार विमान अपहरणाच्या वेळी जसा भारतावर दबाव होता तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविला.




गेल्या 24 तासात नेमकं काय घडलं?


बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.


पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.


पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.


त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.


पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.


पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल केले.


संध्याकाळी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.


नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली


आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान याला सोडाव लागलं.


 


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या