पाकिस्तानचं F16 पाडणाऱ्या अभिनंदनचं या ठिकाणी झालं नवं पोस्टिंग

पाकिस्तानचं F16 पाडणाऱ्या अभिनंदनचं या ठिकाणी झालं नवं पोस्टिंग

विंग कमांडर अभिनंदन आता राजस्थानच्या सीमेवर तैनात असणार आहे. पाकिस्तानचं F16 हे विमान त्याने पाडलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 13 मे : बालाकोट इथल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचं F16 हे विमान पाडणारा विंग कमांडर अभिनंदन याला आता नवं पोस्टिंग मिळालं आहे. राजस्थानमधल्या सूरतगढ इथल्या हवाई तळावर त्याची नियुक्ती केली असल्याची माहिती हवाई दलाने दिलीय. पाकिस्तानच्या 60 तास ताब्यात राहिल्यानंतर अभिनंदनची सुटका झाली होती.

या आधी अभिनंदन श्रीनगर इथल्या हवाई दलाच्या तळावर तैनात होता. त्या आधीही एकदा तो राजस्थानात तैनात होता. अभिनंदनने आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षणही राजस्थानातच घेतलं होतं. त्याचे वडिलही हवाई दलात अधिकारी होते. त्यांची नियुक्तीही काही काळ राजस्थानात झाली होती. सुरक्षेच्या कारणांवरून हवाई दलाने अभिनंदनच्या नियुक्तीबाबत जास्त माहिती दिली नाही.

हवाई दलाच्या ज्या पायलटचं विमान किंंवा हेलिकॉप्टर क्रॅश होतं त्यांना नंतर विमान उड्डाणाची परवानगी दिली जात नाही. अशा अदिकाऱ्यांना वेगळं काम दिलं जातं. मात्र अभिनंदनच्या बाबतीत हवाई दल वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी  40 जवानांची हत्या केली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी काश्मीरात भारतीय हवाई हद्दीचा भंग करत घुसखोरी केली होती. त्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाईलाच्या विमानांनी पिटाळून लावलं होतं.

'मिराज 2000' विमान घेऊन अभिनंदनने पाकिस्तानच्या एका F16 विमानाचा पाठलाग केला. त्याने ते विमान पाडलं त्यात पाकिस्तानचा पायलट ठार झाला. मात्र अभिनंदनचं विमान क्रॅश झालं आणि अभिनंदनला पाकिस्तानी हद्दीत उतरावं लागलं. त्यानंतर पाकिस्तानने त्याला ताब्यात घेतलं होतं. नंतर भारताच्या दबावामुळे त्याची सुटका करण्यात आली होती.

या धाडसी महिला पायलटनेही केली होती अभिनंदनला मदत

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पोकिस्तानने जेव्हा भारतावर बदला घेण्याच्या भावनेनं पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठ्या शर्तीने हा हल्ला असफल करण्यात आला. यावेळी भारतीय पायलट पाकिस्तानच्या विमानांना सीमेवरच पाडून आले. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांची खूप चर्चा झाली.

पण हा हल्ला हाणून पाडण्यासाठी ज्या लोकांचा समावेश आहे यात एक नाव गुप्त आहे. यामध्ये एक महिला स्क्वाड्रन लीडरसुद्धा होत्या. ज्यांनी अनेक अशक्य गोष्टींना साधत हल्ला परतवून लावला. सध्या या महिला ऑफिसरचं नाव समोर आलेलं नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने नाव गुपित असलेलंच बरं. पण त्यांच्या या  शौर्याचा गौरव करण्याचं भारतीय हवाई दलानं ठरवलं आहे. हवाई दलाच्या एका विशिष्ट मेडलद्वारे त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

पाकिस्तानी विमानांनवर ठेवलं बारीक लक्ष

या महिला स्क्वाड्रन लीडरने हवाई दलामजध्ये फायटर कंट्रोलरची भूमिका निभावली आहे. सध्या त्या पंजाबमध्ये असलेल्या आयएएफच्या एका रडार कंट्रोल स्टेशनवर काम करत आहेत. 27 फेब्रुवारी रोजी 24-एफ-16, जेएफ -17 एस आणि मिराज -5 ने पाकिस्तानने हल्ला केला, तेव्हा स्क्वाड्रन लीडरने तणावपूर्ण वातावरण हाताळलं आणि भारतीय लष्करी पायलटांना पाकिस्तानी विमानाबद्दल सतत जागृत ठेवलं.

पाकिस्तान हल्ला करेल, ते आधीच स्पष्ट होतं

त्या दिवशी सकाळी वायुसेनाकडून इनपुट मिळत होतं की पाकिस्तान हल्ला करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर 9.45 पर्यंत हे स्पष्ट झालं की पाकिस्तान वायुसेनेने लढाऊ विमानांना नियंत्रण रेखावर पाठवलं. त्यानंतर काही वेळातच, पाकिस्तानच्या हवाई दलातील 4 विमानांनी राजोरीच्या कलाल भागातून सीमा रेषा क्रॉस केली.

First published: May 13, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading