पाहा VIDEO : अभिनंदनप्रमाणेच आता तुम्हीही पाडू शकता पाकिस्तानचं एफ-16 विमान

पाहा VIDEO : अभिनंदनप्रमाणेच आता तुम्हीही पाडू शकता पाकिस्तानचं एफ-16 विमान

विंग कमांडर अभिनंदनप्रमाणेच तुम्हालाही पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडण्याची संधी हवाई दलाने उपलब्ध करून दिली आहे. हवाई दल याबद्दलचा एक व्हिडिओ गेम लाँच करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्ताननेही एफ - 16 विमानांनी हवाई हल्ला केला पण भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावत पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडलं. या मोहिमेचा हिरो ठरलेल्या विंग कमांडर अभिनंदनच्या शौर्याची कहाणी व्हिडिओ गेमच्या माध्यमातून सगळ्यांसमोर येणार आहे.

विंग कमांडर अभिनंदनबद्दलचा हा व्हिडिओ गेम हवाई दल लाँच करणार आहे. या गेममध्ये अभिनंदनची मुख्य व्यक्तिरेखा आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मिग 21 हे लढाऊ विमान दिसेल. याच विमानातून अभिनंदनने पाकिस्तानचं एफ - 16 विमान खाली पाडलं होतं. या गेममध्ये अभिनंदन मिग -21 विमानासोबत उभे असलेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ गेम सध्या तरी एकच जण खेळू शकतो पण लवकरच हा गेम एकाच वेळी अनेक जण खेळू शकतील असा मल्टीप्लेअर मोड जोडला जाणार आहे. भविष्यात येणाऱ्या लढाऊ विमानांबद्दलही युजरला माहिती मिळू शकेल. या गेममध्ये राफेल विमानंही असतील.

काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

भारतीय हवाई दलाने मोबाइल गेमचा हा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये राफेल सोबतच सुखोई 30 MKI, मिग 29, मिराज 2000 या विमानांचाही समावेश करण्यात आला आहे. हा व्हिडिओ गेम 31 जुलैला लाँच होणार आहे, असं हवाई दलाच्या दिल्लीमधल्या मुख्यालयातले विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितलं.

================================================================================================

सचिन अहिरांनी शिवसेना प्रवेशाबद्दल शरद पवारांना काय सांगितलं, पाहा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: July 25, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading