नवी दिल्ली, 1 मार्च : विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात आल्यानंतर विमान उडवण्याकरता किमान 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. त्यासाठी काही नियम आहेत. हवाई दलाच्या नियमानुसार विंग कमांडर अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप करण्यात येईल. विमानातून उडी मारताना मणक्याला मार लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुरुवातीला त्याबाबत मेडिकल चेकअप केलं जाईल. या सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये अभिनंदन पास झाले की त्यानंतर त्यांना विमान उडवण्यासाठी परवानगी दिली जाईल.
पण, फिटनेस चाचणीमध्ये फेल झाल्यास अभिनंदन यांची दुसऱ्या पदावर किंवा विमानावर बदली केली जाईल. भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार या साऱ्या गोष्टी पार पाडल्या जातात.
तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर डोळ्यात नक्कीच अश्रू येतील
विंग कमांडर अभिनंदन परतणार भारतात
पाकिस्तानच्या ताब्यात अससेले विंग कमांडर भारतात परततील. वाघा बॉर्डरवरून त्यांना भारतात आणलं जाईल. त्यांच्या स्वागतासाठी सध्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अनेकजण हार आणि ढोल घेऊन वाघा बॉर्डरवर दाखल झाले आहेत. देशात देखील आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे विंग कमांडर भारतात कधी येतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, अभिनंदन यांना भारतात आणण्यासाठी भारतानं विशेष विमानाचा प्रस्ताव पाकिस्तानपुढे ठेवला होता. पण, पाकिस्ताननं मात्र वाघा बॉर्डरचा पर्याय दिला. सुरक्षेच्या कारणास्तव बिटींग द रिट्रिट सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे 4 वाजताच्या सुमारास अभिनंदन भारतात येतील.
पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना मिग -21 क्रॅश झालं. त्यानंतर अभिनंदन यांनी पॅराशुटच्या साहाय्यानं उडी मारली. यावेळी त्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. पण, दबावामुळे त्यांना केवळ 32 तासांच्या आत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन ?
- 19 जून 2004 मध्ये भारतीय वायूसेनेत दाखल
- मिग-21 बिसॉन लढाऊ विमानाचे वैमानिक
- अभिनंदन यांचे वडील एस. वर्धमान निवृत्त लष्करी अधिकारी
- एस.वर्धमान यांनी एअर मार्शलपद भूषवलं
काय आहे जीनिव्हा करार?
- सैनिक पकडलेल्या क्षणी करार लागू होतो
- युद्धकैदी कुणाला म्हणावं आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे आंतरराष्ट्रीय नियम लागू
- युद्धकैदयाला धर्म,जात, जन्माबद्दल विचारता येत नाही
- नाव, सैन्यातलं पद, नंबर आणि युनिटबद्दल चौकशी शक्य
- युद्धकैदी सैनिकाची जबरदस्तीनं चौकशी करता येत नाही
- युद्धकैद्याला खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधा देणं अनिवार्य
- युद्धकैद्याला गुन्हेगार म्हणून वागणूक देता येत नाही
- कैद्यांना कायदेशीर मदत देणं बंधनकारक
- युद्धकैद्यांवर खटला चालवला जाऊ शकतो
- युद्ध संपल्यानंतर युद्धकैद्यांना मायदेशाच्या हवाली करणं बंधनकारक
- दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांचा मुद्दा गाजल्यानंतर 1949 साली 194 देशांकडून कराराला मान्यता
VIDEO: सतत स्वप्नांचा पाठलाग करणारा निनाद अनंतात विलीन