'...तरच अभिनंदन पुन्हा उडवू शकतील विमान'

'...तरच अभिनंदन पुन्हा उडवू शकतील विमान'

विंग कमांडर अभिनंदन यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून लवकरच सेवेत दाखल होतील अशी माहिती वायुदल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : वायुदल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत एअर स्ट्राईकवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या तब्येतीविषयी देखील माहिती दिली. 'अभिनंदन यांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. आपातकालीन स्थितीमध्ये कॉकपिटमधून बाहेर पडणं हे काम जोखमीचं पण तितकंच महत्त्वपूर्ण असतं. कारण, कॉकपिटमधून बाहेर पडताना मणक्याला झटका बसतो. त्यामुळे कायस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता असते. पण, अभिनंदन सुखरूप आहेत. अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची फिटनेस चाचणी झाल्यानंतर ते लवकरच सेवेत दाखल होतील.'अशी माहिती बी.एस.धनोआ यांनी दिली.

दरम्यान, अभिनंदन यांनी देखील कॉकपिटमध्ये परतण्यासाठी उत्सूक असल्याचं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण आणि संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी देखील अभिनंदन यांची चेन्नईतील रूग्णालयामध्ये भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.आणखी काय म्हणाले

भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि शेजारील देश वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. Air Strike वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना भारतीय वायुदलाचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ' एअर स्ट्राईकमध्ये किती लोक मारले गेले, त्याची संख्या मोजणे वायुदलाचे काम नाही', असे बी.एस. धनोआ यांनी सांगितले.

यावेळेस वायुदल प्रमख धनोआ यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटलं की, 'कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वायुदल क्षणाचाही विचार करणार नाही. गरज भासल्यास भारतीय वायुदल पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाई करेल. तसंच बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने उत्तर दिले नसते.'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या